‘डिंपल गर्ल’ म्हणून ओळखली जाणारी प्रीति झिंटा सध्या रुपेरी पडद्यापासून लांब आहे. ती मागील अनेक वर्षांपासून चित्रपटात झळकलेली नाही. ती सध्या शिमलामध्ये सुट्टीचा आनंद घेत आहे. त्याचबरोबर सध्या ती शेतामध्येही आपले मन रमवत आहे. नुकताच प्रीतिने तिच्या शिमला येथील फार्म हाऊसचा एक सुंदर व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यामध्ये ती आनंदाने सफरचंदाने भरलेली झाडे दाखवत आहे आणि आपल्या सफरचंदाच्या आठवणी सांगत आहे. या व्हिडिओमध्ये प्रीति खूपच आनंदी दिसत आहे.
सफरचंदाने भरलेले झाड पाहून ती आनंदाने उड्या मारत आहे. प्रीति या व्हिडिओमध्ये सांगत आहे की, तिने तिच्या बालपणीचे सुंदर दिवस तिच्या आजी आजोबा आणि मामांसोबत घालवले आहेत. ती पुढे असेही म्हणाली की, “जेव्हा कामगार सफरचंद तोडण्याचे काम करत असतील, तेव्हा त्यांना त्रास नव्हता द्यायला पाहिजे. तसेच सफरचंदासोबत खेळणे आणि ते इकडे- तिकडे फेकण्यासही बंदी होती.” (Dimple Girl enjoys farming in Shimla, video posted)
ती पुढे म्हणाली की, “माझे आवडते काम सफरचंद तोडून मोठे आणि लहान सफरचंद गोळा करणे होते. मला सफरचंदाचा रस बनवायला देखील आवडतो. दोन वर्षांपूर्वी मी अधिकृत शेतकरी होते. हिमाचल पट्ट्यातील सफरचंद शेती समुदायाचा एक भाग असल्याचा मला आनंद आहे.”
प्रीति झिंटा अनेकदा तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर शेतीशी संबंधित व्हिडिओ शेअर करत असते. ती पुढे असे ही म्हणाली की, सफरचंदाचा हंगाम नेहमीच खूप खास असतो, तेव्हा अनेक नियमांचे पालन करावे लागते.
प्रीति झिंटाच्या अभिनयाच्या कारकिर्दीबद्दल बोलायचं झाले, तर तिने ‘दिल से’ या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर पदार्पण केले होते. तिचा शेवटचा चित्रपट ‘भैयाजी सुपरहिट’ हा होता. तिने आपल्या कारकिर्दीत अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. त्याचबरोबर अनेक पुरस्कार देखील तिला मिळाले आहेत.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-बिकिनी अन् दोन वेण्या घालून अभिनेत्री मोनालिसाने केले मालदीवमधील फोटो शेअर, पतीही दिसला शर्टलेस
-‘सुंदरा गं माझी’, सायली संजीवच्या स्टायलिश लूकवर ‘या’ अभिनेत्रीची लक्षवेधी कमेंट
-राडाच ना! ईशा गुप्ताने केली बोल्डनेसची सीमा पार, बिकिनी फोटो जोरदार व्हायरल