Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

बदनामी केल्याप्रकरणी अभिनेत्री दिपाली सय्यद यांची भाऊसाहेब शिंदे विरोधात पोलिसांत तक्रार

अभिनयातून राजकारणात सक्रिय झालेल्या नेत्या दीपाली सय्यद नेहमीच त्यांच्या विवादित वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. मागील काही दिवसांपासून त्या सतत एका गोष्टीमुळे गाजत आहे. ती गोष्ट म्हणजे भाऊसाहेब शिंदे यांनी त्यांच्यावर केलेले आरोप. अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी पाकिस्तानी नागरिकत्व स्वीकारल्याचा गंभीर आरोप त्यांचे माजी स्वीय सहाय्यक भाऊसाहेब शिंदे यांनी केला होता.

या सोबतच त्यांनी त्यांच्यावर अनेक गंभीर आरोप देखील केले आता या सर्व गोष्टींवर मौन सोडत दीपाली यांनी शिंदे यांच्यावर मुंबईतील ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. ओशिवरा पोलिसांकडून बदनामी केल्याप्रकरणी शिंदेंवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भाऊसाहेब शिंदे यांनी ४ एप्रिल रोजी पत्रकार परिषद घेऊन दिपाली सय्यद यांच्याविरोधात गंभीर आरोप केले होते. त्यात सय्यद यांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचे सांगत २०१९ मध्ये त्यांनी बनावट पारपत्र बनवले होते. त्या पाकिस्तानी नागरिक असून त्यांचे नाव सोफिया सय्यद असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे. याशिवाय त्यांच्या दुबई आणि लंडनमध्ये मालमत्ता असून, सामूदायिक विवाहाच्या नावाखाली अनेक बोगस लग्न लावल्याचा आरोपही त्यांनी केला होता.

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडवणीस यांच्याकडे अनेक वेळा लेखी तक्रार करून आणि पुरावे सादर करूनही दिपाली सय्यद यांच्यावर अद्याप कोणतीच कारवाई झाली नाही. जर लवकरच त्यांच्यावर कारवाई झाली नाही तर आगामी काळात गृहमंत्री देवेंद्र फडवणीस यांना राज्यात फिरू दिले जाणार नाही आणि राज्यातील भाजप कार्यालये तोडफोड करून जाळून टाकू, असा इशाराही भाऊसाहेब शिंदे यांनी दिला आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अण्णांचा हटके अंदाज! नागराज मंजुळने वाजवली हलगी अन् आकाश-सायलीने केला भन्नाट डान्स, व्हिडिओ व्हायरल

आपल्या विवादित आणि मुक्त वक्तव्यांमुळे सतत चर्चित असणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीला ओळखले का?

हे देखील वाचा