Tuesday, June 24, 2025
Home अन्य दीपिका कक्कर आहे प्रेग्नेंट? जोर धरलेल्या बातम्यांवर अभिनेत्रीने ‘या’ शब्दांत दिली प्रतिक्रिया

दीपिका कक्कर आहे प्रेग्नेंट? जोर धरलेल्या बातम्यांवर अभिनेत्रीने ‘या’ शब्दांत दिली प्रतिक्रिया

आपल्या आवडत्या कलाकारांविषयी जाणून घेण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. ते काय खातात, काय पितात, कसे राहतात, त्यांच्या आयुष्यात सध्या काय चाललंय? या विषयी चाहत्यांमध्ये नेहमीच चर्चा चालू असते. अशामध्ये चहिते जोडपे विवाहीत असेल, तर ते पालक कधी बनणार? याची ओढ त्या दोघांपेक्षा चाहत्यांनाच अधिक असते. अशातच टीव्हीवरील प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका कक्कर तिच्या प्रेग्नेंसीच्या बातम्यांमुळे चांगलीच चर्चेत आली आहे.

टीव्हीची लोकप्रिय अभिनेत्री दीपिका कक्कर सोशल मीडियावर खूप सक्रिय राहते. ती जितकी जास्त सक्रिय असते, तितकीच ती ट्रोल देखील होत राहते. पण ती या ट्रोल्सला कधीच घाबरत नाही आणि सडेतोड उत्तर देते. अलीकडेच ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. तिच्या प्रेग्नेंसीच्या बातम्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चाहते म्हणत आहेत की, दीपिका आणि तिचा पती शोएब इब्राहिम लवकरच पालक होणार आहेत. या अहवालांना अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. पण आता दीपिकाने स्वतः पुढे येऊन या बातम्यांवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. (dipika kakkar pregnant actress rejected rumours and give reaction to troll)

दीपिका कक्कर अलीकडेच मुंबईतील एका हॉटेलमध्ये एका दुकानाच्या उद्घाटनासाठी पोहोचली होती. या दरम्यान तिने माध्यमांशी संवादही साधला. माध्यमातील वृत्तानुसार, जेव्हा मीडियाने दीपिकाला तिच्या प्रेग्नेंसीबद्दल विचारले, तेव्हा अभिनेत्री हैराण झाली आणि तिने त्यांना दमदार अंदाजात उत्तर दिले. ती म्हणाली, “काय खरंच? माझ्या आयुष्याबद्दल चांगली बातमी तुम्ही मला देत ​​आहात का? वाव!” दीपिकाच्या या स्टाईलने मिळालेल्या प्रतिसादामुळे तिच्या प्रेग्नेंसीच्या बातम्या केवळ अफवा असल्याचे स्पष्ट झाले. तिने किंवा तिचा पती शोएबने प्रेग्नेंसीबद्दल अधिकृत घोषणा केलेली नाही.

दीपिकासोबत असे घडण्याची ही पहिली वेळ नाही. गेल्या महिन्यातही तिला ट्रोल करण्यात आले होते. लोकांनी तिला घरातील मोलकरीण म्हटले होते. खरं तर, दीपिका अनेकदा तिच्या घरी काम करताना आणि स्वयंपाक करून सर्व्ह करण्याचे व्हिडिओ तिच्या व्हिडिओ ब्लॉगमध्ये शेअर करते. यामुळेच तिला ट्रोल करण्यात आले होते. लाइव्ह दरम्यान, काही लोकांनी दीपिकाच्या सासरच्या लोकांवर आरोप केला होता की, ते अभिनेत्रीला मोलकरणीसारखे वागवतात.

 

 

हे देखील वाचा