Saturday, April 11, 2026
Home टेलिव्हिजन तुमच्यासाठी कायपण! पतीच्या प्रेमापोटी ‘या’ अभिनेत्रीने केलं थेट टक्कल, पण कारण काय?

तुमच्यासाठी कायपण! पतीच्या प्रेमापोटी ‘या’ अभिनेत्रीने केलं थेट टक्कल, पण कारण काय?

प्रेम आणि लग्नाचा अर्थ तेव्हाच पूर्ण होतो, जेव्हा दोन व्यक्ती एकमेकांना शेवटच्या श्वासापर्यंत साथ देतात. बॉलिवूड आणि टीव्ही अभिनेता सूरज थापर (Suraj Thapar) आणि त्याची पत्नी दीप्ती ध्यानी यांनी खरे प्रेम आणि लग्नाचे महत्त्व सांगितले आहे. दीप्तीने आपल्या पतीसाठी आपली सर्वात मौल्यवान वस्तू त्यागली आहे.

पती सूरज थापरसाठी केले टक्कल
होय! दीप्तीने तिरुपती बालाजी मंदिरात जाऊन पती सूरज थापर याच्या उत्तम आरोग्यासाठी मुंडण करण्याचा नवस मागितला होता. तिची इच्छा पूर्ण झाल्यानंतर, अभिनेत्रीने तिचे मुंडण केले आहे आणि तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक फोटो देखील शेअर केला आहे. केस नसतानाही दीप्ती खूप सुंदर दिसत आहे. फोटो शेअर करत तिने लिहिले, “तेरे नाम सूरज.” (dipti dhyani shaved her hair for suraj thapar)

सूरज थापरला करण्यात आले होते आयसीयूमध्ये दाखल
खरं तर, टीव्ही अभिनेत्री दीप्ती ध्यानी हिने तिरुपती येथे नवस केला होता की, जर तिचा पती सूरज थापर पूर्णपणे बरा झाला, तर ती आपले मुंडन करून घेईल. आता तिचा नवरा बरा झाला असून, नवस पूर्ण झाल्यानंतर अभिनेत्रीने मुंडन केले आहे. अभिनेत्रीने ३० मे रोजी तिचा फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला.

कोविड-१९ने त्रस्त असलेला सूरज जेव्हा आयसीयूमध्ये शेवटचे श्वास मोजत होता, तेव्हा त्याची पत्नी दीप्ती ‘सावित्री’ बनून आपल्या पतीच्या जीवाचे रक्षण करण्यासाठी देवाकडे प्रार्थना करत होती. रिपोर्ट्सनुसार, कोरोनाने त्रस्त असलेल्या सूरजची प्रकृती त्यावेळी खूपच बिघडली होती आणि त्याचे ७० टक्के फुफ्फुस खराब झाले होते. त्यानंतर दीप्तीने तिरुपती बालाजी मंदिरात जाऊन पतीसाठी केसांचा त्याग करण्याचा नवस मागितला.

दीप्तीसाठी केसांपेक्षा सूरज आहे महत्त्वाचा
सूरज थापरने मुलाखतीत सांगितले की, जेव्हा त्याला दीप्तीच्या नवसाबद्दल कळले, तेव्हा त्याला धक्काच बसला. तो म्हणाला, “मी घरी येताच दीप्तीने मला तिच्या नवसाबद्दल सांगितले. मी आश्चर्यचकित होऊन पुन्हा पुन्हा विचारत राहिलो. मात्र, तिच्या केसांपेक्षा माझे आयुष्य तिच्यासाठी महत्त्वाचे असल्याचे तिने सांगितले.” सूरज आपल्या पत्नीचे कौतुक करताना म्हणाला की, तिची ताकदीने सर्वकाही बदलले.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा