Monday, March 4, 2024

सनी देओलच्या चाहत्यांसाठी आनंदवार्ता; गदर 3 लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

बॉलिवूडचा सुपर डुपर हिट चित्रपट ‘गदर-एक प्रेम कथा’ ने काही काळापूर्वी बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला होता. तारा सिंगची भूमिका साकारणाऱ्या सनी देओलचा हा चित्रपट 2001 साली प्रदर्शित झाला होता. ‘गदर'(Gadar) चित्रपट प्रदर्शित होऊन 22 वर्षांनंतर म्हणजेच गेल्या वर्षी त्याचा सिक्वल ‘गदर-2’ प्रदर्शित झाला होता. गदरप्रमाणेच या चित्रपटानेही बॉक्स ऑफिसवर धमाका केला होता. दरम्यान, सनी देओलच्या(sunny deol) चाहत्यांसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी आली आहे. गदर फ्रँचायझीच्या निर्मात्यांनी ‘गदर-3’ बनवण्याची घोषणा केली आहे. म्हणजेच तारा सिंगची जादू पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

अनिल शर्मा यांनी गदर 3 बनवण्याची पुष्टी केली
पिंक व्हिलाच्या रिपोर्टनुसार, ‘गदर’ आणि ‘गदर 2′(Gadar 2) चे दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी ‘गदर 3’ बनवण्याची पुष्टी केली आहे. त्याची कथाही लाॅक झाली आहे. झी स्टुडिओने या चित्रपटाला हिरवा झेंडाही दाखवला आहे. पिंक व्हिलाने सूत्रांच्या हवाल्याने सांगितले आहे की, झी स्टुडिओ, अनिल शर्मा आणि सनी देओल यांच्यातील पेपरवर्कही पूर्ण झाले आहे. गदर-2 रिलीज झाल्यानंतर दिग्दर्शक अनिल शर्मा यांची टीम गदर-3(Gadar 3) बनवण्याच्या विचारात होती,आणि आता तो विचार प्रत्यक्षात उतरवण्यासाठी टीम तयार असल्याचेही आता स्पष्ट झाले आहे.

याआधीच्या दोन्ही चित्रपटांपेक्षा जास्त धमाकेदार असेल ‘गदर 3’
गदर 3 हा चित्रपटही भारत-पाकिस्तानच्या पार्श्वभूमीवर आधारित असल्याचे सांगण्यात येत आहे. पहिल्या दोन चित्रपटांपेक्षा हा चित्रपट खूपच वेगळा आणि धमाकेदार असेल असे निर्मात्यांनी सांगितले आहे. या चित्रपटामध्येही जबरदस्त ऍक्शन पाहायला मिळणार आहे. जर सर्व काही योजनेनुसार झाले तर या चित्रपटाचे शूटिंग 2025 मध्ये सुरू होऊ शकते असा इशाराही दिग्दर्शकाने दिला आहे. अनिल शर्मा सध्या त्यांचा आगामी चित्रपट ‘जर्नी’च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. या चित्रपटात त्यांचा मुलगा उत्कर्ष शर्मा आणि नाना पाटेकर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

लवकरंच बॉर्डर चित्रपटाचाही बनवणार सिक्वेल
सनी देओलच्या बॉर्डर(Border) या सुपरहिट चित्रपटाचा सीक्वल देखील बनवला जाणार आहे. भारत-पाकिस्तान युद्धावर आधारित हा चित्रपट 1997 साली प्रदर्शित झाला होता. प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर असा धमुमाकुळ घातला की आजपर्यंत लोक त्या चित्रपटाला विसरले नाहीत. बॉर्डर व्यतिरिक्त सनी देओल सध्या ‘लाहोर: 1947′(Lahor: 1947) च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.

हे देखील वाचा