Wednesday, July 3, 2024

ख्वाडा फेम भाऊराव कऱ्हाडे यांच्या आगामी ‘हैद्राबाद कस्टडी’ या सिनेमाबद्दल यूट्यूब व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार अधिक माहिती

मराठी मनोरंजनविश्वातील प्रभावशाली दिग्दर्शक असलेले भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे लवकरच ‘हैद्राबाद कस्टडी’ नावाचा सिनेमा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘ख्वाडा’ या आपल्या पहिल्याच सिनेमातून नावलौकिक मिळवलेले आणि थेट राष्ट्रीय पुरस्कारांवर मोहोर उमटवलेले दिग्दर्शक म्हणून भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे ओळखले जातात. आपल्या पहिल्याच सिनेमातून त्यांनी त्यांच्यातली प्रतिभा लोकांसमोर सादर केली. आता त्यांच्या आगामी ‘हैद्राबाद कस्टडी’ नावाचा सिनेमा घेऊन येत आहे. हा चित्रपट गुन्हेगार आणि पोलीस यांच्यावर आधारित आहे.

‘ख्वाडा’ नंतर भाऊराव कऱ्हाडे यांच्या दुसऱ्या ‘बबन’ या सिनेमाला देखील प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला होता. आता ‘हैद्राबाद कस्टडी’ हा त्यांचा तिसरा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. ‘हैद्राबाद कस्टडी या चित्रपटामधील सर्वच कलाकार हे नवीन असून, सिनेमाची कथा देखील खूपच वेगळी आणि पठडीबाहेरील असणार आहे. आज (१७ मे) रोजी या या सिनेमाची टीम संध्याकाळी एक व्हिडिओ पोस्ट करणार आहे. या व्हिडिओमधून प्रेक्षकांच्या या चित्रपटासंदर्भातील विविध प्रेक्षकांच्या प्रश्नांना उत्तरं मिळणार आहे.

या संदर्भातली एक पोस्ट भाऊराव कऱ्हाडे यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केली आहे. त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले, “हैद्राबाद कस्टडीच्या शूटींग दरम्यान कोवीड १९ च्या महामारीमुळे लॉकडाऊन पडले. कोरोनाच्या या दीड दोन वर्षात दुर्दैवाने पुढचं शूट लावता आलं नाही. बऱ्याच सिनेरसिकांचे आणि माझ्यावर मनापासून प्रेम करणाऱ्या चाहत्यांचे फोन, मेसेजेस सुरू झाले. ते आजतागायतही सुरू आहेत. हैद्राबाद कस्टडी कधी येणार ? हैद्राबाद कस्टडीचं काय झालं ? शूट संपलं की अजून बाकी आहे ? या एक ना अनेक प्रश्नांना उत्तरं देणारा हैद्राबाद कस्टडीचा एक विडीओ आज सायंकाळी ५ वाजून ५ मिनिटांनी आपल्या Chitraksha Nirmitee या युट्यूब चॅनेलवर प्रदर्शित होत आहे. विडीओ पाहून तुमची उत्सुकता अजून वाढेल हे निश्चित आहे. तयार रहा. हैद्राबाद कस्टडी येतोय, लवकरच ! तुमच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद कायम राहुद्यात.”

एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून येणाऱ्या भाऊराव कऱ्हाडे यांनी ‘ख्वाडा’ या चित्रपटासाठी खूपच मेहनत घेतली. सिनेमाच्या शूटिंगदरम्यान त्यांना आर्थिक अडचण आल्यानंतर त्यांनी त्यांची शेतजमीन विकून शूटिंग पूर्ण केले. त्यांच्या या ‘ख्वाडा’ सिनेमाने तुफान बज निर्माण केला आणि राष्ट्रीय पुरस्कार पटकावला. आता त्यांचा ‘हैद्राबाद कस्टडी’ हा सिनेमा कधी येतो आणि किती धमाल करतो हे बघणे नक्कीच महत्वाचे ठरेल.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

 

हे देखील वाचा