Wednesday, June 25, 2025
Home मराठी ‘मी बालपणापासून संघ स्वयंसेवक’, दिग्पाल लांजेकरची सोशल मीडिया पोस्ट चर्चेत

‘मी बालपणापासून संघ स्वयंसेवक’, दिग्पाल लांजेकरची सोशल मीडिया पोस्ट चर्चेत

मराठी सिने जगतात सध्या अनेक ऐतिहासिक चित्रपटांची निर्मिती होताना दिसत आहे. यामध्ये दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या ‘पावनखिंड’, ‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’, या शिवकालीन चित्रपटांनी प्रचंड लोकप्रियता मिळवली होती. जगभरातील शिवप्रेमींचा या चित्रपटांना मोठा प्रतिसाद पाहायला मिळाला. या चित्रपटानंतर दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या अष्टकातील पुढील निर्मीतीची शिवप्रेमींना जोरदार उत्सुकता लागली आहे. त्याआधी दिग्पाल लांजेकर यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली होती. या भेटीचा आनंद त्यांनी सोशल मीडियावरुन व्यक्त केला आहे. काय आहे त्यांची व्हायरल पोस्ट चला जाणून घेऊ. 

लोकप्रिय मराठी दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर (Digpal Lanjekar) यांच्या ऐतिहासिक चित्रपटांनी मराठी सिनेसृष्टीला नवी ओळख दिली आहे. छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यनिर्मितीमध्ये आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या मावळ्यांच्या जिवनावरील या चित्रपटांना सिनेमागृहात अभूतपुर्व असा प्रतिसाद पाहायला मिळत आहे. अलिकडेच दिग्पाल लांजेकर यांनी संघाच्या रेशीमबागेला भेट दिली. यावेळी त्यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांचीही भेट घेतली. या भेटीचा आनंद आणि वृत्तांत त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन सांगितला आहे. काय आहे हे प्रकरण चला जाणून घेऊ.

या व्हायरल पोस्टमध्ये दिग्पाल लांजेकर यांनी सांगितले की, “शिवराज अष्टकाच्या माध्यमातून समाजाचा अनेकांगी आशीर्वाद आणि प्रेम सातत्याने लाभते आहे. पण माणसाच्या आयुष्यात काही क्षण हे सोनेरी अक्षरांनी लिहिण्यासारखे असतात. आणि माझ्या आयुष्यात मला हे क्षण छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने बऱ्याचदा अनुभवता आले आहेत आणि येत आहेत. दि. २५ आणि २६ जुलै २०२२ या दोन दिवसातले तर, काही क्षण नव्हे तर काही तास सोनेरी माझ्या आयुष्याला सुवर्ण अनुभवाचे दान देऊन गेले. “रेशीमबाग” या ठिकाणी जाण्याचं … ती वास्तू अनुभवण्याचं … तिथे वास्तव्य करण्याचं प्रत्येक स्वयंसेवकाचं स्वप्न असतं… आणि या सगळ्यात तुम्हाला संघाच्या कुटुंबप्रमुखांचा म्हणजेच सरसंघचालकांचा सहवास लाभणार असेल तर ? बालपणापासून स्वयंसेवक असलेल्या मला आणि माझा बंधू निखिल याला हीच पर्वणी मिळाली २५ आणि २६ जुलैला.”

https://www.facebook.com/photo/?fbid=10159880363713150&set=pcb.10159880366023150 (दिग्पाल लांजेकर यांची संपूर्ण पोस्ट )

या भल्यामोठ्या पोस्टमध्ये दिग्पाल लांजेकर यांनी मोहन भागवत यांच्या भेटीचा आनंद आपल्या शब्दात व्यक्त केला आहे. या पोस्टसोबत त्यांनी मोहन भागवत यांच्यासोबतचा एक फोटोही शेअर केला आहे. त्यांची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून त्यावर नेटकऱ्यांच्याही प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.

हेही वाचा –

आदिल आधी ‘इतक्या’ वेळा प्रेमात पडली होती राखी सावंत, जाणून घ्या तिच्या बॉयफ्रेंड्सची लिस्ट

‘बाकी सगळं सोडा, पैसे खाल्ले का नाही ह्यावर बोला’ संजय राऊतांवर अभिनेत्याने साधला निशाणा

‘त्या’ प्रसंगानंतर शूटवरून घरी आल्यावर ढसाढसा रडली होती मृणाल ठाकूर, ‘अशी’ केली बॉलिवूडमध्ये एंट्री

 

हे देखील वाचा