Saturday, July 6, 2024

करण जोहरचे विचित्र फॅशनचे कपडे पाहून चाहत्यांनी धरलं डोकं; म्हणाले, ‘अरेरे! सगळा मूड खराब केला’

बॉलिवूडचे अनेक कलाकार आपल्या फॅशन सेन्समुळे चर्चेत असतात. वेगवेगळे ड्रेस परिधान करून ते सोशल मीडियावर सतत चर्चेत असतात. यापैकी एक असलेला बॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध निर्माता करण जोहर (Karan Johar) देखील त्याच्या फॅशन सेन्समुळे चर्चेत असतो. तो अनेकदा डिझायनर कपड्यांमधील त्याचे फोटो शेअर करतो, जे त्याच्या चाहत्यांना खूप आवडतात. पण अनेकवेळा करण असे कपडे परिधान करतो, ज्यामुळे त्याला ट्रोलिंगला सामोरे जावे लागते. आता करणचे काही फोटो व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये त्याला त्याच्या कपड्यांवरून ट्रोल केले जात आहे.

फॅशन स्टाईलमुळे झाला ट्रोल
करणने निराळे कपडे परिधान केल्याचे फोटोंमध्ये दिसत आहे. त्याने वरून अंगावर शाल घेतली असून, तो कॅमेऱ्यासमोर वेगवेगळ्या पोझ देताना दिसत आहे. करणचे हे फोटो राजस्थानमधील आहेत. काही चाहत्यांना करणची ही फॅशनेबल स्टाईल आवडली नाही आणि त्यांनी त्याला ट्रोल करायला सुरुवात केली.

युजर्सने उडवली खिल्ली
फोटोंवर कमेंट करताना एका युजरने लिहिले की, “तौबा-तौबा संपूर्ण मूड खराब केला.” दुसर्‍याने लिहिले, “या गरीबाला छान स्वेटर देऊन मदत करा.” आणखी एका युजरने लिहिले की, “ही काय फॅशन आहे?” दुसऱ्याने कमेंट करताना लिहिले की, ”रणवीर भाऊ भूत यावरही चढले, बिचारा.”

५ वर्षांनंतर करणार आहे दिग्दर्शन
करण जोहरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर सध्या तो त्याच्या नवीन चित्रपट ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’मुळे चर्चेत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन तो स्वत: करत आहे. यात रणवीर सिंगसोबत आलिया भट्ट मुख्य भूमिकेत आहे. याशिवाय धर्मेंद्र, शबाना आझमी आणि जया बच्चन यांसारखे दिग्गज कलाकारही या चित्रपटाचा भाग आहेत. यापूर्वी, करण जोहरने २०१६ मध्ये ‘ए दिल है मुश्किल’ हा चित्रपट दिग्दर्शित केला होता, जो बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता.

हेही वाचा-

हे देखील वाचा