‘तो चांगला दिसत नाही’, रणवीर सिंगच्या लूकमुळे करण जोहर झाला होता नाराज, नंतर मागितली सर्वांसमोर माफी

Director karan johar did not like Ranveer Singh and Anushka Sharma's pair for Band Baja Barat movie


सन 2010 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बॅंड बाजा बारात’ या चित्रपटातील श्रृती आणि बिट्टूची जोडी कोण विसरेल? नक्कीच नाही विसरणार. या जोडीचे पात्र अनुष्का शर्मा आणि रणवीर सिंग यांनी निभावले होते. या चित्रपटातील त्यांच्या जोडीला खूप प्रेम मिळाले. अनेक दिग्दर्शक, निर्माते आणि कलाकारांनी या जोडीचे खूप कौतुक केले होते. पण बॉलिवूडमध्ये एक व्यक्ती अशी होती की, ज्या व्यक्तीचा अनुष्का आणि रणवीर यांच्या जोडीवर अजिबात‌ विश्वास नव्हता. त्याला वाटले नव्हते की, हे दोघे ते पात्र नीट निभावू शकतील. तो व्यक्ती म्हणजे बॉलिवूड मधील दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहर. या गोष्टीचा खुलासा स्वतः करण जोहरने त्याच्या एका मुलाखतीत केला होता.

करण जोहरने सांगितले होते की, त्याने जेव्हा पहिल्यांदा रणवीर सिंगला पाहिले होते, तेव्हा तो खूपच नाराज झाला होता. तेव्हाच त्याने आदित्य चोप्राला सांगितले होते की, रणवीर सिंग हा अजिबात चांगला दिसत नाहीये. करणने मुलाखतीत सांगितले होते की, “मी रणवीर सिंगला आदित्य चोप्राच्या ऑफिसमध्ये पहिल्यांदा पाहिले होते. तो टेबल टेनिस खेळत होता, तेव्हा आदित्यने सांगितले की, हा तो नवीन मुलगा आहे, जो ‘बॅंड बाजा बारात’ या चित्रपटामध्ये काम करणार आहे. त्यावेळी मी त्याला म्हटले ते सगळं ठीक आहे, पण तो दिसायला बघ ना कसा आहे.”

करणने पुढे सांगितले की, “मी जेव्हा बॅंड बाजा बारात या चित्रपटाचा पोस्टर पहिला, तेव्हा मी आदित्यला म्हणालो की, हा चित्रपट बघायला कोणालाच आवडणार नाही. या मुलामध्ये काहीतरी आहे पण ते पोस्टरमध्ये दिसत नाहीये. याला तू बदल.” एवढंच काय तर मी अनुष्का शर्माबाबत देखील म्हटले होते की, “तू या मुलीला कसं काय घेतलंस.”

पण जेव्हा हा चित्रपट प्रदर्शित झाला, तेव्हा करण पूर्णतः चुकीचा ठरला.

त्यांनतर करण जोहरने रणवीर सिंग आणि अनुष्का शर्माचे खूप कौतुक केले. नॅशनल टीव्हीवर त्याने दोघांची माफी देखील मागितली होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-डॉक्टरांना ‘सैतान’ म्हणणे सुनील पालला पडले भलतेच महागात! कॉमेडियन विरोधात एफआयआर दाखल

-‘अंदाज अपना अपना’ चित्रपटादरम्यान ‘या’ कारणामुळे आमिर खानला आवडत नव्हता सलमान खान; नंतर बनले जिगरी मित्र

-काय आहे प्रियांकाच्या सौंदर्य आणि तंदुरुस्तीचे गुपीत? वाचून तुम्हीही कराल स्वतःमध्ये बदल


Leave A Reply

Your email address will not be published.