सध्या केदार शिंदे कमालीचा चर्चेत आला आहे. २०२३ हे वर्ष त्याच्यासाठी खूपच खास होते. यावर्षी त्याचे दोन बहुप्रतीक्षित असे सिनेमे आले. एकतर ‘महाराष्ट्र शाहीर’ आणि दुसरा म्हणजे ‘बाईपण भारी देवा’. यातला महाराष्ट्र्र शाहीर हा सिनेमा अयशस्वी झाला तर बाई पण भारी देवा सिनेमा ब्लॉकबस्टर ठरला आहे. सिनेमाने ६५ कोटींची कमाई केली असून, अजूनही सिनेमा हाऊसफुल ठरत आहे. सिनेमाला प्रेक्षकांनी खास करून महिला वर्गाने दिलेला प्रतिसाद भरवणारा आहे. याच पार्श्वभूमीवर केदार शिंदेने एका मोठ्या वृत्तसंस्थेला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीमध्ये त्याने अनेक खुलासे केले आहेत. यातीलच केदारने त्याला राजकारणात रस असल्याचे सांगत तो राजकारणात येऊ शकतो असे सांगितले आहे.
View this post on Instagram
केदार शिंदेने राजकारणात येण्याबद्दल बोलताना सांगितले, “माझी राजकारणात येण्याची इच्छा आहे. आता जे काही राजकारणात सुरू आहे किंबहुना आता चालू असलेल्या राजकारणावर मी बोलणार नाही, मात्र नेहमीच आपण कुंपणावर बसून बोलत असतो, आता ते ओलांडून रिंगणात उतरण्याची वेळ आली आहे. मात्र मी सध्या मनोरंजनक्षेत्रात काम करून माझ्या घरात आर्थिक स्थैर्य आणून मग राजकारणात येणार आहे. सांस्कृतिकदृष्ट्या सकारात्मक काम करण्यासाठी मला राजकारणात जायचे आहे. तसे पाहिले तर राज ठाकरेंनी मला माझ्या कठीण काळात खूपच पाठिंबा दिला. त्यामुळे मला आता माणसाबरोबर उभे राहायचे आहे.”
केदार शिंदेंच्या या वक्तव्यावरून ते नक्कीच लवकरच राजकारणात येणार हे नक्की. सोबतच ते कोणत्या पक्षात जाणार याची एक प्रत्यक्षरित्या हिंट देखील त्यांनी दिली आहे. जेव्हा केदार शिंदे राजकारणात येतील तेव्हा ते मनसेमध्ये गेले तर आश्चर्य वाटायला नको. दरम्यान या मुलाखतीमध्ये केदार शिंदे यांनी अनेक खुलासे केले आहेत.
तत्पूर्वी केदार शिंदे यांचा बाईपण भारी देवा हा सिनेमा दणक्यात सुरु असून, यात वंदना गुप्ते, रोहिणी हट्टंगडी, सुचित्रा बांदेकर, दीप्ती नवलकर, दीपा परब आणि सुकन्या मोने यांच्या मुख्य भूमिका आहेत.