Thursday, July 31, 2025
Home बॉलीवूड महेश भट्ट पडले ‘या’ माेठ्या संकटातून बाहेर, मुलगा राहुलने दिली लवकर रिकवरी हाेण्याची खात्री

महेश भट्ट पडले ‘या’ माेठ्या संकटातून बाहेर, मुलगा राहुलने दिली लवकर रिकवरी हाेण्याची खात्री

लोकप्रिय दिग्दर्शक महेश भट्ट हार्ट सर्जरी नंतर घरी पोहोचले आहेत. त्यांचा मुलगा राहुल याने त्यांची प्रकृती ठीक असून ते लवकरच बरे होत असल्याची माहिती दिली आहे. नियमित तपासणीदरम्यान महेश भट्ट यांना डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे या आठवड्यात त्यांची अँजिओप्लास्टी झाली आणि सध्या ते घरीच बरे होत आहेत.

महेश भट्ट (mahesh bhatt) नियमित तपासणीसाठी गेल्या महिन्यात जवळच्या रुग्णालयात गेले होते, ज्यादरम्यान डॉक्टरांनी त्यांना हृदय शस्त्रक्रियेचा सल्ला दिला. त्यानंतर 4 दिवसांपूर्वी महेश भट्ट यांच्यावर हृदय शस्त्रक्रिया झाली. सध्या ते आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहे आणि आपल्य प्रकृतीची काळजी घेत लवकरच बरे हाेत आहे.

महेश भट्ट यांनी थाटामाटात केले नात राहाचे स्वागत
महेश भट्ट गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये आजोबा झाले. याचा आनंद व्यक्त करत त्यांनी साेशल मीडियावर अनेक फाेटाे शेअर केले. रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांची मुलगी राहा हिचे त्यांनी आनंदाने स्वागत केले. यावेळी नाना महेश ब्लॅक आउटफिटमध्ये दिसले. आलियाची मुलगी राहा ही महेश भट्ट यांच्या घरातील पहिली नात आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Alia Bhatt ???? (@aliaabhatt)

महेश भट्ट यांनी अनेक दमदार चित्रपटांच केलं दिग्दर्शन
महेश भट्ट यांनी वयाच्या 26 व्या वर्षी ‘मंजिलें और भी हैं’ या चित्रपटाद्वारे दिग्दर्शन करिअरला सुरुवात केली. यानंतर त्यांनी बॉलिवूडला अनेक उत्तम चित्रपट दिले ज्यात ‘सारांश’, ‘आशिकी’, ‘जेहर’ आणि ‘जिस्म’ या सारख्या दमदार चित्रपटांचा समावेश आहे. महेश भट्ट यांनी ‘राज’, ‘दुश्मन’ आणि ‘फूटपाथ’ यांसारख्या चित्रपटांच्या स्क्रिप्टही लिहिल्या आहेत.(director mahesh bhatt returns home after heart surgery son rahul bhatt informs about his speedy recovery)

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
दाक्षिणात्य अभिनेत्री शुभ्रा अय्यप्पाने बॉयफ्रेंडसोबत गुपचूप केले लग्न, पाहा भन्नाट फाेटाे

इंडियन आयडॉलमध्ये रीना रॉयचे कौतुक पडले शत्रुघ्न सिन्हा यांना महागात; पत्नी म्हणाली, ‘तू घरी…’

हे देखील वाचा