मराठी कलाकारांना हिंदी कलाकारांकडून मिळणाऱ्या वागणुकीबद्दल आतापर्यंत आपण अनेक मतमतांतर ऐकले आहेत, कोणाचे अनुभव किस्से, चांगले वाईट आदी अनेक गोष्टी ऐकल्या. तसे पाहिले तर हा एक मोठा मुद्दा आहे. अनेक बॉलिवूडमधील मोठे स्टार्सस मराठी कलाकारांना किंमत देत नाही. एकत्र काम केलेल्या मराठी कलाकारांना देखील ते त्यांचे काम झाल्यावर ओळख दाखवत नाही. असे आपण अनेक अनुभव कलाकारांचे ऐकले असतील. नक्कीच याला अपवाद देखील असतील किंबहुना आहेच. मात्र मराठीमधील प्रसिद्द दिग्दर्शक असलेल्या आणि मराठी तारका फेम महेश टिळेकर यांनी नुकताच त्यांचा यालाच संबंधित असा एक अनुभव शेअर केला आहे. महेश टिळेकर यांनी थेट बॉलिवूडमधील स्टार करीना कपूरवर निशाणा साधत मराठी कलाकरांना देखील टार्गेट केले आहे.
View this post on Instagram
महेश यांनी त्यांच्या एका सोशल मीडिया पोस्टवर एक अनुभव शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांची आणि करीनाचे तुलना देखील केली आहे. यामध्ये त्यांनी लिहिले, “कुठं मूर्ती आणि कुठे करीना?
नुकताच इन्फोसिसचे नारायण मूर्ती यांच्या इंटरव्ह्यूचा एक व्हिडिओ पाहिला ज्यात ते सांगत होते की लंडनहून ते भारतात येत असताना फ्लाईट मध्ये त्यांच्या पुढच्या सीटवर करीना कपूर बसली होती. फ्लाईट मधील काही लोक नारायण मूर्ती यांच्याजवळ येऊन त्यांना अभिवादन करत होते ,दोन शब्द बोलत होते आणि लोक आपल्याला रिस्पेक्ट देतायेत म्हणून मूर्ती उभे राहून त्यांच्याशी संवाद साधत होते, पण काही चाहते करीना कपूर जवळ जाऊन तिला हॅलो म्हणत होते तर ही त्यांच्याकडे ढुंकूनही पाहत नव्हती आणि ही गोष्ट नारायण मूर्ती यांना खूप खटकल्याचे त्यांनी सांगितले आणि करिनाचा असा इगो काय कामाचा? असा प्रश्नही त्यांनी केला. 8 वर्षांपूर्वी आमचा मराठी तारका कार्यक्रमाचा परदेशातून शो करून एअरपोर्ट वर आल्यावर पुन्हा तिथे चेकिंग साठी असणाऱ्या रांगेत मी उभा होतो,तर आमच्या कार्यक्रमातील एका मराठी अभिनेत्रीच्या पुढे करीना कपूर उभी होती,तिचा पासपोर्ट दाखवून ती पुढे वळताना तिचा चेहरा दिसला तसा आपली मराठी अभिनेत्री तिच्याशी बोलायला म्हणून लाळ घोटेपणा करत तिच्या मागे धावत गेली पण करीना तिला फाट्यावर मारत झपाझप पावले टाकत पुढे निघून गेली. बरं याच मराठी अभिनेत्रीने करीना कपूर च्या एका लोकप्रिय सिनेमात एका सिन साठी नगण्य भूमिका केली होती तरी देखील करीनाने तिच्याकडे मान वळवून ही पाहिलं नाही, फोटो काढणं तर दूरच.
पण हेच स्वतः च्या प्रेमात असणारे काही सेलिब्रिटी यांचा एखादा सिनेमा रिलीज व्हायचा असेल तेंव्हा जनमानसात मिसळून , चाहत्यांबद्दल प्रेम असल्याचा जो अभिनय करतात त्याला खरच तोड नाही.मागे एका इंटरव्ह्यू मध्ये हिंदीत काम करणारी मराठी अभिनेत्री राधिका आपटे हिने तिला लोकांना फोटो,सेल्फी द्यायला आवडत नाही, ती सही पण देत नाही चाहत्यांना असं सांगत होती. पण काहीच दिवसांपूर्वी OTT वर रिलीज झालेल्या तिच्या एका हिंदी सिनेमाच्या प्रमोशन निमित्ताने मात्र सोशल मीडियावर पॉप्युलर असणाऱ्या काही इन्फ्लुंसर बरोबर सेल्फी देऊन स्वतः ची प्रसिध्दी करून घेत होती. बरं या बयेला ती कुठं राहते तो पत्ता पण लोकांना, तिच्या चाहत्यांना कळू नये असं वाटतं.जर समजलं लोकांना ही कुठं राहते मुंबईत तर काय फरक पडणार आहे? अमिताभ बच्चन,सलमान,शाहरुख यांना पहायला जशी गर्दी जमते तसा जनसमुदाय हीची एक झलक दिसावी म्हणून हिच्या बिल्डिंग बाहेर जमा होणार आहे का??? जेंव्हा कामे मिळणं बंद होतं, प्रसिद्धीचा काळ संपतो तेंव्हा कुणीतरी आपली दखल घ्यावी म्हणून बेचैन होणारे अनेक नट नट्या मी जवळून पाहिले आहे.”
दरम्यान महेश यांच्या या पोस्टवर अनेकांनी त्यांना योग्य सांगत हिंदी कलाकरांना ट्रोल केले आहे. महेश हे त्यांच्या ‘मराठी तारका’ या शोसाठी ओळखले जातात. मात्र त्यांनी अनेक चांगल्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे, ज्यात ‘वन रूम किचन’, ‘गाव तसं चांगलं’ ‘हवाहवाई’ आदी अनेक चित्रपटांचा समावेश आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
बॉलिवूडपासून लांब आत्मिक शांतीसाठी आमिर खानने गाठले नेपाळ, विपश्यना केंद्रात करणार मेडिटेशन
परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांनी गुपचूप उरकला साखरपुडा? डायमंड रिंग फ्लॉन्ट करताना परी झाली स्पॉट










