मनमोहन देसाई हे ७०-८० दशकातील असे एक नाव होते, ज्यांना होत चित्रपटांचा फॉर्म्युला माहित होता. असे म्हणतात की, अमिताभ बच्चन यांना यशाच्या शिखरावर पोहचवण्यामागे मनमोहन देसाई यांचा हात होता. २६ फेब्रुवारी १९३७ मध्ये मुंबईमध्ये जन्म झालेले मनमोहन एक असे दिग्दर्शक आणि निर्माते होते ज्यांना प्रेक्षकांना काय आवडते हे अगदी बरोबर माहित होते. त्यांच्या चित्रपटात असा मसाला असायचा की, चित्रपट बॉक्स ऑफिसवर धमाल करत असे. आयुष्यात सगळे यश मिळून देखील त्यांची प्रेमकहाणी मात्र अधुरी राहिली होती. आज शनिवारी त्यांची जयंती आहे. यानिमित्त जाणून घेऊया त्यांची अधुरी प्रेम कहाणी…
हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध निर्माते मनमोहन देसाई यांनी चित्रपट बनवण्याचे कौशल्य त्यांच्या घरातूनच शिकले. त्यांना १९६० साली आलेला ‘छलिया’ या चित्रपटातून खरे यश मिळाले. त्यानंतर त्यांनी अमिताभ बच्चन यांच्यासोबत अनेक सुपरहिट चित्रपट बनवले. त्यानंतर अमिताभ बच्चन स्टार झाले. त्यांनी ‘परवरिश’, ‘अमर’, ‘अकबर अँथनी’, ‘कुली’, ‘मर्द’, ‘नसिब’, ‘गंगा जुमना सरस्वती’ यांसारखे चित्रपट बनवले. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटांनी खूप चांगली कमाई केली होती. अजूनही प्रेक्षकांमध्ये या चित्रपटांची क्रेझ आहे.
बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेत्री नंदा यांच्यावर मनमोहन खूप प्रेम करत होते. परंतु नंदा या खूप लाजाळू होत्या. त्यामुळे त्यांनी कधीच सगळ्यांसमोर ही गोष्ट सांगितली नाही. मनमोहन देसाई यांचे जीवनप्रभा देसाई यांच्यासोबत लग्न झाले होते. परंतु १० वर्षाचा संसार केल्यानंतर देखील जीवनप्रभा त्यांना सोडून गेली. त्यांना केतन नावाचा एक मुलगा आहे. केतन देखील एक लोकप्रिय निर्माता आहे.
जेव्हा जीवनप्रभा यांचा मृत्यू झाला, तेव्हा मनमोहन यांनी नंदाला त्यांची पत्नी बनवण्याचा निर्णय घेतला. माध्यमातील वृत्तानुसार त्यांनी ५५ व्या वर्षी नंदा यांच्याशी साखरपुडा केला. तेव्हा त्या ५४ वर्षाच्या होत्या. त्यांचे लग्न देखील झाले असते; परंतु तेव्हाच नंदा यांच्या आईला कॅन्सर असल्याचे समजले आणि त्यांनी लग्नाचा निर्णय जरा पुढे ढकलला. परंतु यामध्ये असे झाले की, मनमोहन यांचे बाल्कनीमधून खाली पडून मृत्यू झाला.
मनमोहन यांचे निधन १ मार्च १९९४ मध्ये झाले. परंतु त्यांचा मृत्यू अजूनही एका रहस्यमय कहाणी सारखा आहे. अजूनही या गोष्टीची माहिती मिळाली नाही की, मनमोहन यांना कोणी ढकलले होते की, त्यांनी स्वतः आत्महत्या केली. त्यानंतर नंदा खूप एकट्या पडल्या होत्या त्यांनी देखील नंतर लग्न केले नाही. २५ मार्च २०१४ साली हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा देखील मृत्यू झाला.

हेही वाचा :