Saturday, March 15, 2025
Home बॉलीवूड सस्पेन्स थ्रिलर बनवण्यासाठी प्रसिद्ध आहे मोहित सुरी, आतापर्यंत ‘या’ सुपरहिट चित्रपटांचं केलंय दिग्दर्शन

सस्पेन्स थ्रिलर बनवण्यासाठी प्रसिद्ध आहे मोहित सुरी, आतापर्यंत ‘या’ सुपरहिट चित्रपटांचं केलंय दिग्दर्शन

हे वर्ष बॉलिवूडसाठी चांगले राहिले नाही. या सहा महिन्यांत आतापर्यंत अनेक बड्या स्टार्सचे चित्रपट फ्लॉप झाले आहेत. रणबीर कपूरच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘शमशेरा’ या चित्रपटातही हीच परिस्थिती पाहायला मिळाली. अशा परिस्थितीत, आता लोकांच्या आशा मोहित सूरीचा चित्रपट ‘एक व्हिलन रिटर्न्स’वर आहेत. खरं तर, मोहित त्याच्या १७ वर्षांच्या कारकिर्दीत सस्पेन्स थ्रिलर चित्रपट बनवण्यासाठी प्रसिद्ध आहे. त्याने आपल्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट दिले आहेत. अशा परिस्थितीत, लोकांना आशा आहे की, यावेळीही नक्कीच काहीतरी चांगलं पाहायला मिळेल. हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी आज आम्ही तुम्हाला त्याच्या पाच सुपरहिट चित्रपटांबद्दल सांगणार आहोत, ज्यांच्यामुळे तो खूप प्रसिद्ध झाला.

एक व्हिलन
साल २०१४मध्ये साली रिलीज झालेला हा चित्रपट मोहित सूरीच्या सुपरहिट चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १०५ कोटींहून अधिक कमाई केली. सिद्धार्थ मल्होत्रा, रितेश देशमुख आणि श्रद्धा कपूर यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा एक सस्पेन्स थ्रिलर चित्रपट होता. या चित्रपटातील रितेशच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले होते. यासोबतच मोहितने त्याच्या दिग्दर्शनासाठी बरीच प्रशंसाही मिळवली. (director mohit suri hit movie)

आशिकी २
मोहित दिग्दर्शित या चित्रपटाने प्रदर्शित झाल्यानंतर बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. हा चित्रपट लोकांना चांगलाच आवडला होता. त्याची गाणी आजही लोकांच्या जिभेवर आहेत. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरही चांगली कमाई केली. कमी बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने एकूण ७८.४२ कोटींची कमाई केली. या कमाईमुळे तो ब्लॉकबस्टर घोषित झाला.

मर्डर २
हा मोहितच्या करिअरमधील सर्वोत्तम चित्रपटांपैकी एक आहे. सस्पेन्सने भरलेल्या या चित्रपटाची कथा लोकांना आवडली होती. शगुफ्ता रफीक आणि महेश भट्ट यांनी शहारे आणणाऱ्या या चित्रपटाची पटकथा लिहिली आहे. इमरान हाश्मी आणि जॅकलिन फर्नांडिस स्टारर हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. २०११ मध्ये रिलीज झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ४८ कोटींची कमाई केली होती.

राज द मिस्ट्री कंटिन्यूज
सस्पेन्स थ्रिलरशिवाय मोहितने एका हॉरर चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. ‘राज द मिस्ट्री कंटिन्यूज’ हा त्याच्या उत्कृष्ट चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटात इमरान हाश्मी, कंगना रणौत आणि अध्यायन सुमन दिसले होते. या चित्रपटाला समीक्षकांबरोबरच लोकांचाही चांगला प्रतिसाद मिळाला. तो बॉक्स ऑफिसवर हिट म्हणूनही घोषित झाला.

हे देखील वाचा