Sunday, July 14, 2024

आख्ख्या जगाने हटाई केल्यानंतर ‘या’ दिग्दर्शकाचा ‘लाल सिंग चड्ढा’वर निशाणा; म्हणाले, ‘बकवास सिनेमे…’

‘मिस्टर पर्फेक्शनिस्ट’ म्हणून ओळखला जाणारा अभिनेता आमिर खान याने त्याच्या अभियनाने मोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे. मागील महिन्यात ‘रक्षाबंधन’ दिवशी त्याचा ‘लाल सिंग चड्ढा’ हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. त्याच्या या सिनेमाकडून प्रेक्षकांना खूप अपेक्षा होत्या. मात्र, हा सिनेमा जोरदार आपटला. अनेकजण हा सिनेमा न चालण्यामागे वेगवेगळी कारणे सांगत आहे. कुणी हा सिनेमा न चालण्यामागे बॉयकॉट ट्रेंड सांगत आहे, तर कुणी या सिनेमाची कहाणी रटाळवाणी असल्याचे सांगत आहे. आता दिग्दर्शक प्रकाश झा यांनीही ‘लाल सिंग चड्ढा’ सिनेमाबद्दल मोठे वक्तव्य केले आहे.

काय म्हणाले प्रकाश झा?
‘आश्रम’ या वेबसीरिजचे दिग्दर्शक प्रकाश झा (Prakash Jha) हे सध्या त्यांच्या ‘मट्टो की सायकिल’ या सिनेमामुळे चर्चेत आहेत. या सिनेमाच्या प्रमोशनदरम्यान प्रकाश झा यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना म्हटले की, “जर सिनेमा चांगला असेल, तर तो चालेल. हा इंडस्ट्रीसाठी फक्त एक वेकअप कॉल आहे.” पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, “त्यांना समजले पाहिजे की, ते बकवास बनवत आहेत. फक्त पैसे, कार्पोरेट्स आणि अभिनेत्यांना जास्त पैसे देऊन सिनेमे बनवले जाऊ शकत नाहीत. एक चांगली कहाणी लिहिण्याची गरज आहे, जी तुम्हाला समजेल आणि तुमचे मनोरंजन करेल.”

बॉलिवूड सिनेमांबद्दल बोलताना प्रकाश झा म्हणाले की, “त्यांना अशी कहाणी बनवली पाहिजे, जी लोकांशी जोडलेली असेल. हिंदी इंडस्ट्रीतील लोक चर्चा हिंदीतच करतात, पण बनवतात काय, फक्त रिमेक? जर तुमच्याकडे सांगण्यासाठी कहाणीच नाहीये, तर तुम्ही सिनेमे बनवणे बंद करा.”

‘चित्रपट निर्मात्यांनी मेहनत घेतली पाहिजे’
प्रकाश झा म्हणाले की, “चित्रपट निर्मात्यांना चांगली मेहनत घेण्याची गरज आहे. त्यांना विचार करावा लागेल की, प्रेक्षक सिनेमे पाहण्यासाठी चित्रपटगृहात जात का नाहीयेत.” बॉयकॉट कल्चरबद्दल बोलताना ते म्हणाले की, “हा ट्रेंड नेहमीपासूनच आहे. फरक फक्त एवढाच आहे की, आता लोक सोशल मीडियावर आहे.”

आमिरच्या चित्रपटाबद्दल बोलताना ते म्हणाले की, “जर ‘दंगल’ किंवा ‘लगान’ फ्लॉप झाला असता, तर समजले असते. मात्र, ‘लाल सिंग चड्ढा’ सिनेमाला पहिल्या दिवसापासूनच पसंती मिळाली नाहीये.” पुढे त्यांनी असेही सांगितले की, “असा कुणीही भेटला नाही, ज्याने म्हटले असेल की, ‘व्वा! काय सिनेमा होता.'”

आता प्रकाश झा यांनी त्यांची प्रतिक्रिया तर मांडलीये, पण आता आमिर खान यावर काय प्रत्युत्तर देतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
दुर्दैवी! राज कपूरांनी ज्या मित्रासाठी 1 रुपयात साईन केला सिनेमा, फ्लॉप झाल्यानंतर त्यानेच सोडले होते जग
अक्षय कुमार आणि कपिल शर्माचे बिनसले? म्हणाला, ‘तू नजर लावल्याने सिनेमे फ्लॉप होतायेत’
‘विक्रम वेधा’चे जबरदस्त पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला; बहुप्रतिक्षित ट्रेलर लाँचची तारीखही घोषित

हे देखील वाचा