सुप्रसिद्ध यूट्यूबर कंटेंट निर्माता आणि विनोदी कलाकार भुवन बाम आजकाल बराच चर्चेत आहे. भुवन एका वेब शोद्वारे सर्वांसमोर येण्यासाठी सज्ज झाला आहे. यूट्यूब ओरिजिनल म्हणून त्याची पहिली वेबसीरिज लवकरच प्रदर्शित होणार आहे. या सीरिजचे नाव ‘ढिंढोरा’ असून त्याचे पोस्टर प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक एसएस राजामौली यांनी रविवारी (३ ऑक्टोबर) सोशल मीडियावर शेअर केले होते. पोस्टर समोर आल्यानंतर चाहते ही वेबसीरिज पाहण्यासाठी खूप उत्सुक झाले आहेत.
या सीरिजमध्ये भुवन बाम त्याच्या परिचित पात्रांच्या युनिव्हर्ससोबत दिसणार आहे. सीरिज थोडी ‘बीबी की वाइन्स’ सारखी दिसत आहे, पण त्याच्याशी संबंधित सूत्रांनी सांगितले की, यावेळी भुवन बाम त्याच्या पहिल्या वेब सीरिजमध्ये काहीतरी वेगळे वापरणार आहे. त्याची प्रदर्शन तारीख नंतर जाहीर केली जाईल.
हिमांक गौर दिग्दर्शित ‘ढिंढोरा’ या वेबसीरिजचे एकूण आठ भाग आहेत. ही एक मजा- मस्तीच्या कथेवर आधारित सीरिज आहे. या सीरिजमध्ये, भुवनच्या प्रसिद्ध सीरिज ‘बीबी की वाइन्स’मध्ये दिसलेल्या सुमारे १० पात्रांची एक कथा बनवली आहे. असेही सांगितले जाते की, यापूर्वी ही वेबसीरिज एक चित्रपट म्हणून प्रदर्शित होणार होती, परंतु यूट्यूबला मूळ सीरिजप्रमाणे प्रदर्शित करण्याची आकर्षक ऑफर मिळताच त्याची संपूर्ण रणनीती बदलली गेली.
Have heard that @bhuvan_bam is the first content creator from India to make a show with all the characters he has created on his channel.
Makes me so happy to see young talent bringing new ideas for audiences. Wishing him all the best for #Dhindora !!@Rohitonweb @himankgaur pic.twitter.com/ncjyAfwrc3— rajamouli ss (@ssrajamouli) October 3, 2021
भुवन त्याच्या पहिल्या वेबसीरिजचे पोस्टर प्रदर्शित झाल्यावर खूप उत्साही झाला आहे. त्याने आपल्या सर्व चाहत्यांचे आणि समर्थकांचे आभार मानले, ज्यांनी गेल्या सहा वर्षांच्या यूट्यूब प्रवासात त्याला पाठिंबा दिला. वेबसीरिजच्या निर्मात्यांच्या मते, यूट्यूब हा त्यांचा वेबसीरिज ‘धिंडोरा’ प्रदर्शित करण्यासाठी योग्य प्लॅटफॉर्म आहे. ज्याद्वारे ती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचेल आणि याद्वारे दोघांचे व्यावसायिक संबंधही मजबूत होतील.
मिळालेल्या माहितीनुसार, ‘ढिंढोरा’ ही वेबसीरिज भुवन बामच्या आधीच लोकप्रिय असलेल्या पात्रांसोबत एक सामान्य दिनचर्या म्हणून सुरू होईल. परंतु कुटुंबातील अनपेक्षित खरेदीमुळे संपूर्ण कुटुंबात भूकंप येतो. यानंतर घडलेल्या घटना सामान्य माणसाच्या अपेक्षांच्या दृष्टिकोनातून विणल्या गेल्या आहेत आणि ‘ढिंढोरा’ ही वेबसीरिज सामान्य माणसाच्या इच्छा कधी कधी हास्याचा विषय बनतात हे दाखवण्याचा प्रयत्न करेल.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-आनंद गगनात मावेना! तब्बल ‘इतके’ फॉलोव्हर्स पूर्ण झाल्याच्या आनंदात ऋताने शेअर केली खास पोस्ट