Friday, November 22, 2024
Home बॉलीवूड एकेकाळी दिग्दर्शक रोहित शेट्टीने लोकल ट्रेनमध्ये खाल्ला आहे महिलांकडून चप्पलीने मार, स्वतःच केला खुलासा

एकेकाळी दिग्दर्शक रोहित शेट्टीने लोकल ट्रेनमध्ये खाल्ला आहे महिलांकडून चप्पलीने मार, स्वतःच केला खुलासा

रोहित शेट्टी (Rohit Shetty) हा बॉलिवूडमधील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकांपैकी एक आहे आणि त्याचा प्रत्येक चित्रपट रेकॉर्डब्रेक कमाई करतो. त्याने आजवर अनेक हिट आणि ब्लॉकबस्टर सिनेमे दिले आहेत. रोहितचा सिनेमा म्हणजे दमदार स्टंट्स आणि भरपूर ऍक्शन असणार हे सर्वांनाच माहित असते. आज (१४ मार्च) रोहित त्याचा वाढदिवस साजरा करत आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया त्याच्या संघर्षाबद्दल. रोहित आज चांगल्या पदावर पोहोचला आहे. पण इथपर्यंत पोहोचण्यासाठी त्याला खूप त्रास सहन करावा लागला आहे. लोकल ट्रेनमध्ये चप्पलेने मार देखील खावा लागला होता.

रोहित शेट्टीचा लोकल ट्रेनने प्रवास

एका मुलाखतीदरम्यान दिग्दर्शक रोहित त्याच्या स्ट्रगल डेजवर बोलताना दिसला. मुलाखतीत जेव्हा रोहितला विचारण्यात आले की, तुम्ही लोकल ट्रेनमध्ये शेवटचा प्रवास कधी केला होता. याला उत्तर देताना तो म्हणतो की, “लोकल ट्रेनमध्ये मी खूप लांबचा प्रवास केला आहे. लहानपणापासून माझा आणि लोकल ट्रेनचा संबंध आहे.” संभाषणादरम्यान रोहितने लोकल ट्रेनचा एक मजेदार क्षणही शेअर केला.

Director Rohit Shetty
photo courtesy instagramitsrohitshetty

रोहित सांगतो की, लहानपणी तो शाळेत जाण्यासाठी लोकल ट्रेनने प्रवास करायचा. त्यावेळी पुरुषांच्या डब्यात खूप गर्दी असायची. त्यामुळे त्याला टाळण्यासाठी तो पटकन लेडीज कोचमध्ये चढायचा. त्यावेळी तो लहान होता आणि त्याला शाळेच्या गणवेशात पाहून कुणी काही बोलायचे नाही. रोहितलाही त्याची हळूहळू सवय झाली. त्याची उंची केव्हा वाढली आणि तो मोठा दिसू लागला हे त्याला कळलेच नाही. पण एके दिवशी तो ट्रेनमध्ये चढला तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या सर्व महिलांनी त्याला पाहून आरडाओरडा केला. एवढेच नाही, तर सर्व महिला त्याला चप्पलने मारहाण करण्याच्या तयारीत होत्या. त्याला पाहून स्त्रिया म्हणत होत्या की, “मारा… मारा…हा इथे कसा आला.”

Rohit Shetty
Photo Courtesy Instagramitsrohitshetty

लोकल ट्रेनचा अविस्मरणीय प्रवास

लोकल ट्रेनबद्दल बोलताना रोहित सांगतो की, “त्या दिवशी मी लोकल ट्रेनमधल्या सगळ्या आंटींना सांगत राहिलो की, मी एक लहान मुलगा आहे. पण ते मान्य करायला कोणी तयार नव्हते.” या घटनेनंतर रोहित इतका घाबरला की, त्याने पुन्हा महिला कोचमध्ये कधीही चढणार नाही अशी शपथ घेतली. रोहित सांगतो की, “त्या दिवसापासून मी ट्रेन सोडायला तयार होतो, पण कधीच लेडीज कोचमध्ये चढलो नाही.”

रोहित शेट्टी त्याच्या चित्रपटांमधील ऍक्शन सीन आणि महागड्या वाहनांसाठी प्रसिद्ध आहे. त्याची ही जबरदस्त डायरेक्शन अनेकांना आवडली आहे. म्हणूनच रोहित शेट्टीला बॉलिवूडचा आईनस्टाईन देखील म्हटले जाते.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘झूठा’ गाण्याच्या प्रदर्शनावेळी जोरजोरात रडली राखी सावंत म्हणाली, ‘मी संसाराची स्वप्न नाही पाहू शकत का?’

जय हो..! कोट्यवधी भारतीयांना गुडन्यूज, आरआरआर चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्याला मिळाला मानाचा ऑस्कर पुरस्कार

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा