Friday, July 5, 2024

बॉलिवूडमध्ये खलनायक म्हणून लोकप्रिय असणारे एम. बी. शेट्टी यांनी एकेकाळी वेटर म्हणून केले होते काम

बॉलिवूड विश्वात ६०-७० च्या दशकात सर्वाधिक ऍक्शन चित्रपटांचा बोलबाला होता. अनेक मोठे कलाकार एकापेक्षा जास्त ऍक्शन ओरिएंटेड चित्रपटांमध्ये दिसले. हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वोत्कृष्ट स्टंट मॅन, ऍक्शन कोरिओग्राफर आणि एक चांगला सहाय्यक अभिनेता, ज्यांना संपूर्ण जग आणि बॉलिवूडमध्ये शेट्टीच्या नावाने ओळखले जाते. खलनायक, स्टंटमॅन आणि ऍक्शन कोरिओग्राफर म्हणून त्यांनी ७०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले. अनेक मोठ्या अभिनेत्यांच्या बॉडी डबल म्हणूनही त्यांनी काम केले.

युट्यूब शो तबस्सुम टॉकीजनुसार, स्टंटमॅन आणि ऍक्शन कोरिओग्राफर असण्याव्यतिरिक्त, शेट्टी एक साइड आर्टिस्ट देखील होते. ज्यांना तुम्ही ‘दीवार’, ‘डॉन’सह अनेक चित्रपटांमध्ये नकारात्मक भूमिकांमध्ये पाहिले असेल. भयंकर हावभाव आणि टक्कल पडलेल्या शेट्टी यांना पाहून प्रेक्षकांना घाम फुटायचा. शेट्टी यांच्यासाठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये स्थान निर्माण करणे सोपे काम नव्हते. त्यांचा जन्म मंगळूर येथे १९३१ मध्ये अत्यंत गरीब कुटुंबात झाला.

आयुष्यात त्यांना स्वतःहून काहीतरी करावे लागेल, असे त्यांच्या लहानपणीच त्यांच्या आई-वडिलांनी त्यांना सांगितले होते. त्यामुळे शेट्टी मुंबईत आले. सुरुवातीला त्यांनी हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम केले आणि खरकटी भांडीही धुतली. १९५६ मध्ये त्यांना ‘हीर’ चित्रपटातून फाईट इंस्ट्रक्टर म्हणून काम मिळू लागले. काही चित्रपटांमध्ये ते खलनायक बनले, तर अनेक कन्नड चित्रपटांमध्ये त्यांना स्टंट दिग्दर्शनाचे काम पाहू लागले.

हेही पाहा : सलमान सोबत बॉलिवूड मध्ये केलेले पदार्पण, मात्र सध्या विकेतेय घरोघरी जेवणाचे डब्बे | Pooja Dadwal

त्यांनी सुमारे ७०० चित्रपटांमध्ये ऍक्शन दिग्दर्शन केले असून, ज्यामध्ये ‘डॉन’, ‘द ग्रेट गॅम्बलर’, ‘त्रिशूल’ आणि ‘दीवार’ या चित्रपटांचा समावेश आहे. एकदा एका स्टंट दरम्यान, त्यांच्या सहकलाकाराला आगीत जळून आपला जीव गमवावा लागला. ज्यासाठी शेट्टी यांनी स्वतःला दोषी मानले. यानंतर ते डिप्रेशनमध्ये गेले आणि खूप मद्यपान करू लागले. ते गरीब झाले आणि घर चालवण्यासाठी पत्नीला चित्रपटांमध्ये छोट्या भूमिका कराव्या लागल्या. शेट्टी यांचे यकृत खराब झाले आणि वयाच्या ५१ व्या वर्षी त्यांचे निधन झाले.

शेट्टी यांचे दोनदा लग्न झाले होते आणि त्यांना पहिल्या लग्नापासून दोन मुले आणि दोन मुली होत्या. यानंतर, त्यांनी रत्नासोबत दुसरे लग्न केले. रोहित शेट्टीचा जन्म त्यांची दुसरी पत्नी रत्ना हिच्या पोटी झाला. त्यांना एकूण पाच मुले होती. जो हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वोत्कृष्ट आणि यशस्वी दिग्दर्शक आहे. ज्याने ‘सिंघम’, ‘चेन्नई एक्सप्रेस’, ‘गोलमाल’ सारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. रोहित शेट्टी असे त्याचे नाव आहे.

हेही वाचा :

हे देखील वाचा