बॉलिवूडमधील सुपरहिट दिग्दर्शक रोहित शेट्टी हा त्याच्या दमदार ऍक्शन चित्रपटांसाठी ओळखला जातो. रोहितचा सिनेमा म्हटल्यावर त्यात कॉमेडी, ऍक्शन, ड्रामा आदी सर्वच मिर्च मसाला असा हे आधीच सर्वाना माहित असते. त्याने त्याच्या एका हटके स्टाइलने लोकांच्या मनात एक ओळख निर्माण केली आहे. रोहित आणि मराठी यांचे खूपच जवळचे नाते आहे. त्याच्या सगळ्या चित्रपटांमध्ये मराठी कलाकरांना तो नेहमीच प्राधान्य देतो. याचे कारण त्याने अनेकदा बोलून दाखवले आहे. सोबतच तो मराठी कार्यक्रमांमध्ये नेहमीच त्याचे सिनेमे प्रमोट करतो. त्यामुळे त्याला अनेकदा तो मराठी सिनेमा कधी करणार असा प्रश्न विचारला जायचा. मात्र आता रोहितने या प्रश्नावर उत्तर आणले आहे. नुकताच त्याच्या ‘स्कूल, कॉलेज आणि लाइफ’ या मराठी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.
‘स्कूल, कॉलेज आणि लाइफ’ या मराठी चित्रपटाची रोहित शेट्टीने निर्मिती केली असून या सिनेमाच्या माध्यमातून त्याने मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटात जितेंद्र जोशी महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे. जितेंद्रने चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर करत एक सुंदर पोस्ट लिहिली आहे. या सिनेमात त्याला कशी संधी मिळाली याबाबत त्याने पोस्टमध्ये लिहिले आहे.
View this post on Instagram
जितेंद्रने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले, “एक दिवस रोहित शेट्टी सरांच्या कार्यालयातून संपर्क होतो, बोलावलं जातं, समोर स्वतः रोहित सर आणि त्यांच्यासोबत विहान सूर्यवंशी नावाचा एक तरुण दिग्दर्शक. रोहित सर प्रेमाने सिनेमा करण्याची गळ घालतात परंतु विहानच्या तोंडून कथा ऐकल्यानंतर एक उत्तम प्रेमळ गोष्ट ऐकल्याचा आणि त्या गोष्टीतल्या तरुणाच्या प्रेमळ चाचाची भूमिका करण्याची अनोखी संधी मिळाल्याचा आनंद होतो. चित्रपटाचं चित्रीकरण कोल्हापुरात उत्तम पार पडतं . मध्ये अनेक दिवस जातात आणि अचानक फोनवर समजतं की चित्रपट प्रदर्शित होतोय. एकीकडे आपण वेगळ्याच चित्रपटाचं हिमाचल प्रदेश येथे चित्रीकरण करताना या छोट्याशा ट्रेलर सोबत पुन्हा कोल्हापुरात येऊन धडकतो. चित्रपट या माध्यमाची हीच कमाल आहे. खरं तर तेजस्वी, करण आणि विहान या तिघांचा हा पहिला मराठी चित्रपट परंतु प्रदर्शित जरा वेळाने होतोय कारण चांगल्या गोष्टी मुरायला आणि साध्य व्हायला वेळ लागतोच. सर्वाँना शुभेच्छा!! कसा वाटतोय ट्रेलर कळवा”.
सध्या जितेंद्रची पोस्ट चांगलीच व्हायरल होत असून, त्यावर अनेक कलाकार आणि नेटकरी कमेंट्स करताना दिसत आहे. रोहित शेट्टीच्या ‘स्कूल, कॉलेज आणि लाइफ’ या चित्रपटात जितेंद्र जोशीसोबतच करण किशोर, अभिनेत्री तेजस्वी प्रकाश, वनिता खरात, प्रसाद जवादे यांच्या मुख्य भूमिका आहेत. हा चित्रपट १४ एप्रिलला चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अनुभव सिन्हा यांच्या सांगण्यावरून आशुतोष राणा यांनी रागाच्या भरात राजकुमाराला लगावली होती चापट
‘तो एका सामान्य माणसासारखे आयुष्य जगतो’ कास्टिंग दिग्दर्शक मुकेश छाबरा यांचा सलमान खानच्या राहणीमानाबद्दल खुलासा