Saturday, June 29, 2024

बॉलिवूडवर शोककळा! हिट सिनेमे देणारा दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड, हार्ट अटॅकने घेतला जीव

हिंदी सिनेसृष्टीला एका पाठोपाठ एक असे धक्के बसत आहेत. २२ ऑगस्ट रोजी ‘बिग बॉस’ फेम सोनाली फोगाट हिचे निधन झाले होते. तिच्या निधनाच्या दु:खातून चाहते बाहेर आले नव्हते, तोवर आता आणखी एक दु:खद बातमी समोर आले आहे. प्रसिद्घ दिग्दर्शक, गीतकार आणि लेखक सावन कुमार टाक यांचे गुरुवारी (दि. २५ ऑगस्ट) सायंकाळी जवळपास ४.१५ वाजता निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने कलाविश्वाचे‌ मोठे नुकसान झाले आहे.

सावन कुमार टाक (Saawan Kumar Taak) यांचा भाचा आणि चित्रपट निर्माता नवीन टाक याने माध्यमांशी संवाद साधला. यावेळी तो म्हणाला की, “डॉक्टरांच्या मते, हृदयविकाराचा झटका आणि त्यांचे अवयव निकामी झाल्याने त्यांचे निधन झाले.”

नवीन टाक यांनी पुढे सांगितले की, “८६ वर्षीय सावन कुमार टाक हे फुफ्फुसाच्या आजाराने त्रस्त होते. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांना खूप अशक्तपणा जाणवत होता आणि त्यांना ताप येत होता. आम्हाला वाटले की, त्यांना न्यूमोनिया झाला असावा. मात्र, रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांचे फुफ्फुस पूर्णत: निकामी झाल्याचे आढळून आले. आयसीयूमध्ये उपचारासाठी दाखल असलेल्या सावन यांचे हृदय हे देखील नीट काम करत नव्हते. अशा परिस्थितीत त्यांची प्रकृती चिंताजनक बनली होती.”

मीना कुमारीसोबत बनवला होता ‘हा’ चित्रपट
तब्बल चार दशकांहून अधिक काळ चाललेल्या त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी संजीव कुमार ते सलमान खान यांसारख्या स्टार्ससोबत काम केले होते. सावन कुमार टाक यांनी निर्माता म्हणून ‘नौनिहाल’ हा पहिला चित्रपट बनवला, ज्यामध्ये संजीव कुमार यांनीही महत्त्वाची भूमिका साकारली होती. सावन यांनी अभिनेत्री मीना कुमारीसोबत दिग्दर्शक म्हणून ‘गोमती के किनारे’ हा पहिला चित्रपट बनवलेला, जो १९७२ मध्ये प्रदर्शित झाला होता.

सावन कुमार टाक यांनी संजीव कुमार, मीना कुमारी व्यतिरिक्त राजेश खन्ना, जीतेंद्र, श्रीदेवी, जया प्रदा, सलमान खान अशा सर्व बड्या स्टार्ससोबत काम करून हिट चित्रपट दिले होते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-
कशी नशिबाने थट्टा आज मांडली! ‘गँग्स ऑफ वासेपूर’ फेम अभिनेत्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल
‘हे’ कलाकार कधीच चढणार नाही ‘कॉफी विद करण’चा उंबरा, कारण आहे खूपच गंभीर
‘इमर्जन्सी’ चित्रपटातून मिलिंद सोमण यांचा खतरनाक लूक समोर, ओळखणे होईल कठिण

हे देखील वाचा