सध्या हिंदी सिनेसृष्टीत अनेक नाविण्यपुर्ण विषयांवर चित्रपटांची निर्मिती होताना दिसत आहे. अनेक दर्जेदार चित्रपट सध्या प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत ज्यामुळे सर्वत्र अशा कथांचे कौतुक होताना दिसत आहेत. त्याचबरोबर अनेक चित्रपटात स्त्री प्रधान कथा रंगवण्यात आल्या आहेत. आता पुन्हा एकदा अशाच प्रकारची स्त्री प्रधान कथा असलेला चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असुन दिग्दर्शक शमास नवाब सिद्दिकी यांनी याबाबत माहिती दिली आहे.
आजपर्यंत सिनेसृष्टीत पुरुषप्रधान व्यक्तीरेखा असलेले चित्रपटच जास्तीत जास्त पाहिले जायचे, मात्र आता काळ बदलत आहे. निर्देशक आता आपल्या नवनवीन कल्पना चित्रपटांमधून मांडत आहेत. ज्यामुळे अनेक प्रथांना फाटा देण्याचाही प्रयत्न केला जात आहेत. आता अशाच एका चित्रपटाची कथा घेऊन प्रतिभावान दिग्दर्शक शमास नवाब सिद्दिकी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. त्यांनी आपल्या ‘यू आर नॉट माय हजबंड’ चित्रपटाची कथा लिहुन पुर्ण झाल्याची माहिती सोशल मीडियावरुन दिली आहे. या चित्रपटासाठी त्यांना एका दमदार महिला कलाकाराची गरज असल्याचंही त्यांनी सांगितले आहे.
लोकप्रिय ट्रेड निर्देशक तरुण आदर्शने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर यासंबधित एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये शमास आपल्या चित्रपटाची कथा लिहुन झाल्याची घोषणा करत आहेत. याविषयी बोलताना तरुणने हा चित्रपट स्त्री प्रधान कथेवर आधारित असुन यामध्ये काम करण्यासाठी त्यांना एका दमदार महिला कलाकाराची आवश्यकता असल्याचे सांगितले आहे.
या चित्रपटाच्या कथेबद्दल बोलताना निर्देशक शमास यांनी सांगितले की, ”कथा पुर्ण झाली आहे. आता माझ्या ‘यू आर नॉट माय हजबंड’ चित्रपटासाठी एका कणखर महिला अभिनेत्रीचा शोध घ्यायचा आहे, जी या भूमिकेला न्याय देऊ शकेल. सोबतच नवाजुद्दिकीन सिद्दिकी आणि मनोज वाजपेयी सारख्या दिग्गज अभिनेत्यांसमोर सरस ठरु शकेल” हा चित्रपट निर्देशक शमास नवाब सिद्दिकी यांच्यासाठी खूप महत्वपुर्ण असल्याचेही बोलले जात आहे, त्यामुळे प्रेक्षकांना या नव्या चित्रपटाची कथा जाणून घेण्याची उत्सुकता लागली आहे.
हेही वाचा :