सध्या डिजिटल प्लॅटफॉर्मला सुगीचे दिवस आले आहेत. हिंदीमध्ये तर अनेक वेबसीरिज प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या वेबसीरिजला मिळणारी लोकप्रियता पाहता निर्माते पुढचा भाग देखील काढतात. चित्रपटांचे प्रदर्शन होत नसल्याने प्रेक्षकांसाठी वेबसीरिज हे मनोरंजनासाठी एक वरदान ठरले आहे. मराठी सिनेसृष्टी देखील मागे नाही. मराठीमध्ये देखील एकापेक्षा एक सरस वेबसीरिज येत आहेत. अनेक वेबसीरिजने प्रेक्षकांचे मनोरंजन करत भरपूर प्रेम देखील मिळवले.
मनोरंजन क्षेत्रात वेगवेगळ्या विषयांवर वेगवेगळ्या प्रकारच्या कलाकृती तयार होतात. यात हॉरर कॉमेडी हा सर्वात जास्त गाजणारा आणि लोकप्रिय होणारा विषय आहे. या विषयावर विविध वेबसीरिज, सिनेमे तयार होतात. लवकरच मराठीमधील प्रसिद्ध दिग्दर्शक आणि रॅपर असणारा श्रेयश जाधव हॉरर कॉमेडी या भन्नाट विषयावर एक वेबसीरिज घेऊन येत आहे. या वेबसीरिजचे नाव आहे ‘चू- मंतर.’ या वेबसीरिजच्या शूटिंगला सुरुवातही झाली आहे. या वेबसीरिजच्या नावावरूनच हे काहीतरी हटके असणार हे नक्की आहे. (director shreyash jadhav, new horor comedy series chu-mantar release soon)
श्रेयश नेहमीच त्याच्या सिनेमांमधून, त्याच्या सीरिजमधून, गाण्यांमधून काहीतरी वेगळे देण्यासाठी ओळखला जातो. अतिशय कमी वयात त्याने मोठे यश संपादन केले. २०१२ साली ‘बाबू बँड बाजा’ सिनेमातून निर्माता म्हणून पदार्पण केले. या सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आणि श्रेयसला मोठी प्रेरणा मिळाली. पहिल्याच सिनेमातून धमाकेदार एन्ट्री करणाऱ्या श्रेयशने पुढे ‘प्रभो शिवाजी’, ‘ऑनलाईन बिनलाईन’, ‘बघतोस काय मुजरा कर’, ‘मी पण सचिन’ आदी अनेक यशस्वी चित्रपटांमधून त्याने त्याची ओळख निर्माण केली. याशिवाय ‘पुणे रॅप’ या त्याच्या रॅपने तर धमाल उडवून दिली होती.
आता श्रेयश ‘चू-मंतर’ या वेबसीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या वेबसीरिजमधून श्रेयश प्रेक्षकांना खळखळून हसवण्यासोबतच घाबरवण्यासाठी सज्ज झाला आहे. या सीरिजमध्ये प्रियदर्शन जाधव, अभिज्ञा भावे, भाग्यश्री मोटे निखिल चव्हाण, किरण गायकवाड, महेश जाधव हे दमदार कलाकार दिसणार आहे. गणराज असोसिएट्स आणि मायरा प्रोडक्शनची निर्मिती असणाऱ्या या ‘चू-मंतर’ सीरिजचे लेखन आणि दिग्दर्शन श्रेयश जाधवनेच केले आहे. विशेष म्हणजे ही वेबसीरिज व्हीमास मराठी या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळणार आहे.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘मार ही डालोगी क्या?’, अमृता खानविलकरच्या बोल्ड अदांवर उमटतायेत चाहत्यांच्या प्रतिक्रिया
-साडीमध्ये खुललंय मराठमोळ्या प्रिया बापटचं सौंदर्य! फोटो शेअर करत म्हणतेय, ‘बैठे बैठे…’
-आनंद गगनात मावेना! तब्बल ‘इतके’ फॉलोव्हर्स पूर्ण झाल्याच्या आनंदात ऋताने शेअर केली खास पोस्ट