Monday, July 1, 2024

एस एस राजामौली म्हणजे बॉक्स ऑफिसचे ‘बाहुबली’, वाचा ’या’ ५ चित्रपटांची पुराव्यासहित यादी

देशातील अव्वल दिग्दर्शकांपैकी एक असा चित्रपट निर्माता, ज्यांचा चित्रपट आजपर्यंत फ्लॉप झाला नाही. ज्या दिवसापासून त्यांनी दिग्दर्शनाच्या दुनियेत पाऊल ठेवले त्या दिवसापासून मी त्यांनी वळून पाहिले नाही. दक्षिणेतील प्रसिद्ध दिग्दर्शक एसएस राजामौली यांच्याबद्दल बोलले जात आहे. ज्यांच्या चित्रपटांनी रेकॉर्डब्रेक कमाई करून इतर प्रादेशिक चित्रपटांना आरसा दाखवला आहे. राजामौली यांचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘आरआरआर’ प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपटही सुपर डुपर हिट ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

जर तुम्ही ‘आरआरआर’ पाहणार असाल, तर त्याआधी तुम्हाला हे माहित असलेच पाहिजे की, राजामौली हे बॉक्स ऑफिसचे बाहुबली का आहेत? चला तर मग राजामौलीच्या अशा ५ चित्रपटांबद्दल जाणून घेऊया, ज्यांनी दिग्दर्शकाच्या करिअरला शिखरावर नेले. या चित्रपटांनी केवळ दक्षिणेतच नव्हे, तर हिंदीतही कमाईचा झेंडा रोवला. राजामौलीच्या ५ ब्लॉकबस्टर चित्रपटांबद्दल जाणून घ्या ज्यांनी त्यांना ‘द राजामौली’ बनवले.

बाहुबली फ्रँचायझी
एसएस राजामौलींच्या त्या एका चित्रपटाने देश-विदेशात धुमाकूळ घातला आणि विक्रमी कमाई करून भारतीय चित्रपटसृष्टीला अभिमान वाटू लागला. त्या ब्लॉकबस्टर चित्रपट ‘बाहुबली’बद्दल प्रथम बोलूया. ‘बाहुबली द बिगिनिंग’ आणि ‘बाहुबली – द कन्क्लूजन’ने बॉक्स ऑफिसवर बंपर कमाई करून इतिहास रचला. प्रभास, राणा डग्गुबती, अनुष्का शेट्टी यांच्या या चित्रपटाने जगभरात १८०० कोटींचा व्यवसाय केला. ‘बाहुबली’ फ्रँचायझीने एकूण ५ राष्ट्रीय पुरस्कार जिंकले.

मक्खी
एखादी माशी गुंडांचे नाक फुंकून त्यांचा खेळ करेल, याची कोणी कल्पना करू शकेल का? नाही? असे राजामौली यांना वाटत होते. २०१२ मध्‍ये ‘मक्‍खी’ या फॅण्‍टसी चित्रपटाने प्रचंड कमाई केली होती. नानी, सुदीप आणि समंथा यांचा हा चित्रपट त्याच्या अनोख्या कथानकासाठी खूप पसंत केला गेला. या चित्रपटाने जवळपास १३० कोटींची कमाई केली होती. त्‍याच्‍या नावावर २ नॅशनल ॲवॉर्डही आहेत. नायक माशीच्या रूपात कसा पुनर्जन्म घेतो आणि आपल्या प्रेयसीला शत्रूंपासून वाचवतो, हे चित्रपटात दाखवले आहे.

मगाधीरा
‘मगाधीरा’ हा पीरियड ऍक्शन ड्रामा चित्रपट तुम्ही पाहिलाच असेल. राम चरण आणि काजल अग्रवाल यांचा हा चित्रपट पुनर्जन्माच्या कथेवर आधारित होता. या चित्रपटाला २ राष्ट्रीय पुरस्कार मिळाले. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १५० कोटींची कमाई केली.

राउडी राठोड
अक्षय कुमार आणि सोनाक्षी सिन्हा यांचा चित्रपट ‘राउडी राठौड’ हा दिग्दर्शक राजामौली यांच्या ‘विक्रमकुडू’ चित्रपटाचा अधिकृत हिंदी रिमेक आहे. २००६ मध्ये प्रदर्शित झालेल्या या तेलुगु हिट चित्रपटात रवी तेजा आणि अनुष्का शेट्टी मुख्य भूमिकेत होते. या ऍक्शन थ्रिलरने जवळपास ११८ कोटींची कमाई केली होती.

यमडोंगा
‘यमडोंगा’ २००७ मध्ये आलेला हा तेलुगु ऍक्शन कॉमेडी चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला होता. या चित्रपटात ज्युनियर एनटीआर, मोहन बाबू, प्रियामणी, ममता मोहनदास यांच्या प्रमुख भूमिका होत्या. हा चित्रपट समीक्षकांना चांगलाच आवडला होता.

राजामौलीच्या फक्त ५ सर्वकालीन ब्लॉकबस्टर चित्रपटांबद्दल जाणून घेतले आहे, परंतु ही यादी तिथेच संपत नाही. राजामौलीने आजवर आपल्या कारकिर्दीत केलेले सर्व चित्रपट आवर्जून पाहावेत असे आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा –

हे देखील वाचा