Monday, July 1, 2024

मनोरंजनाचा तडका! एकाच दिवशी ‘हे’ दोन सुपरहिट चित्रपट होणार प्रदर्शित

चित्रपटसृष्टीत सध्या प्रेक्षकांना दाक्षिणात्य चित्रपटांनी खूपच आकर्षित केले आहे. संपूर्ण देशभर सध्या दाक्षिणात्य सिनेमांची चर्चा ऐकायला मिळत आहे. ‘पुष्पा’सारख्या लोकप्रिय चित्रपटांनी चित्रपटगृहात जोरदार धुमाकुळ घातला होता. याच पार्श्वभूमीवर आता लवकरच आणखी एक धडाकेबाज चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बऱ्याचवेळा पुढे ढकलण्यात आली होती.मात्र आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख निश्चित करण्यात आली आहे.

प्रसिद्ध दिग्दर्शक एसएस राजामौली यांच्या ‘आरआरआर’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. चित्रपटाच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरुन याबद्दलची घोषणा केली असून २५ मार्च ही प्रदर्शनाची तारीख निश्चित करण्यात आली आहे. सोबतच चित्रपटाचा पोस्टरही प्रदर्शित करण्यात आला आहे. आता प्रेक्षकांना या चित्रपटाची उत्सुकता लागली आहे. या बहुचर्चित चित्रपटात अजय देवगण, राम चरण, आलिया भट्ट आणि ज्युनियर एनटीआर हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.

याआधी या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख ७ जानेवारी सांगण्यात आली होती. मात्र कोविडच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आणि अनेक शहरांतील चित्रपटगृहे बंद झाल्याने तारीख पुढे ढकलण्यात आली होती. आता पुन्हा एकदा निर्मात्यांनी देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आल्यानंतर चित्रपट १८ मार्चला प्रदर्शित करण्यात येईल किंवा २८ एप्रिलला प्रदर्शित होइल.

तत्पूर्वी या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेत अनेकवेळा बदल करण्या आला आहे. याआधी चित्रपट ३० जुलै २०२० मध्येच प्रदर्शित करण्यात येणार होता, मात्र कोविडमुळे यात बदल करत १३ आक्टोंबर सांगण्यात आली होती. मात्र आता शेवटी २५ मार्च ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. या चित्रपटातून अजय आणि आलिया पहिल्यांदाच साउथच्या चित्रपटात झळकणार आहेत.

मात्र आता या चित्रपटाच्या नव्या तारखेप्रमाणे त्याच दिवशी ‘भूल भूलैय्या’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे दोन्ही चित्रपटांचा जोरदार टक्कर पाहायला मिळणार आहे. अनीस बाजमी दिग्दर्शित या चित्रपटात कार्तिक आर्यन, कियारा अडवाणी आणि तब्बु यांच्या प्रमुख भूमिका आहेत. त्यामुळे प्रेक्षकांना आता एकाच दिवशी दोन दर्जेदार चित्रपट पाहायला मिळणार आहेत.

हेही वाचा :

हे देखील वाचा