अभिनेत्री दिशा परमार सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती आपले फोटो आणि व्हिडिओ नेहमी चाहत्यांसोबत शेअर करत राहते. अलीकडेच तिने स्वत:चे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती बीचवर असल्याचे दिसत आहे. हे फोटो पोस्ट करताच क्षणी व्हायरल झाले. हे फोटो पाहून चाहते तिच्या सौंदर्याचे तोंडभरून कौतुक करत आहेत. दिशा अलीकडेच तिच्या पतीसोबत मालदीवमध्ये सुट्टी इन्जॉय करताना दिसत आहे. लग्नानंतर दोघेही मालदीवहून सुट्टी इन्जाॅय करून घरी परतले आहे. या ट्रिपचे अनेक तिने फोटो सोशल मीडियावर शेअर केले.
दिशाने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिने पिवळ्या रंगाचा आउटफिट सुंदर ड्रेस परिधान केला आहे. परंतु, दिशाला टॅन होण्याची भीती वाटत आहे. तिने नुकतेच तिचे लेटेस्ट फोटो शेअर केले त्यात ती टॅन झाल्याचे दिसत आहे. राहुल आणि दिशाने सुट्टीचा खूप मस्त आनंद लुटला असल्याचे त्याच्या फोटोंवरून स्पष्ट दिसले. त्यांनी काही फोटो शेअर केले असून, ज्यामध्ये दोघेही खास लूकमध्ये दिसत आहेत. त्यांचा हा खास लूक स्कूबा डायविंगचा होता. या दोघांनी स्कूबा डायविंगपासून ते डिनर डेटपर्यंत प्रत्येक गोष्ट खूप एन्जॉय केली. दिशाने राहुलाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने खास रोमँटिक फोटो शेअर केले.
‘बिग बॉस १४’च्या घरात दिशा परमारला राहुलने हटके स्टाइलमध्ये प्रपोज केले होते. दिशाच्या वाढदिवसाच्या दिवशी त्याने टी-शर्टवर हॅपी बर्थडे लिहित तिला लग्नाची मागणी घातली होती. दिशाने बिग बॉस’च्या घरात येऊन राहुल त्याच्या प्रपोजलचे ‘हो’ उत्तर दिले होते. राहुल वैद्य बिग बॉसचा उपविजेता ठरला. घरातून बाहेर आल्यानंतर त्यांनी १६ जुलै २०२१ला लग्न केले. लग्नानंतर ते दोघे कुटुंबासोबत वेळ घालवताना दिसले. मात्र, आता राहुलच्या वाढदिवसाला दोघांनी सुट्टीचा प्लॅन बनवला आणि मालदीवला गेले होते.
दिशा परमारविषयी बोलायचे झाले, तर दिशा एक टेलिव्हिजन अभिनेत्री आणि मॉडेल आहे. दिशा आणि राहुल यांनी नुकतंच लग्नानंतर गणेश चतुर्थी साजरी केली. सध्या ती ‘बड़े अच्छे लगते हैं २’ या शोमध्ये काम करत आहे. या शोमध्ये दिशा आणि नकुलची जोडी शोमध्ये खूप पसंत केली जात आहे. दुसरीकडे, राहुल ‘खतरों के खिलाडी ११’ मध्ये दिसला होता.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
–‘असं रूप आणि शृंगार असल्यास कोणासही येड लागेल’, म्हणत चाहत्यांनी केले अक्षयाच्या सौंदर्याचे कौतुक