Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

लग्नच बनलं टायगर-दिशाच्या ब्रेकअपचं कारण! पण नेमका कोणी दिला नकार?

श्रॉफ (Tiger Shroff) आणि दिशा पटानीचे (Disha Patani) ब्रेकअप गेल्या दोन दिवसांपासून चर्चेचा विषय आहे. ६ वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर दोघांनीही वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. या जोडप्याच्या अचानक विभक्त झाल्याची चाहत्यांसाठी बातमी एका मोठ्या धक्क्यापेक्षा कमी नाही. दरम्यान, आता त्यांच्या ब्रेकअपचे कारणही समोर आले आहे. मीडिया रिपोर्ट्सच्या दाव्यानुसार, लग्नाच्या कारणामुळे दोघांचे नाते तुटले आहे.

लग्नच बनलं ब्रेकअपचं कारण!
टायगरच्या मित्राच्या हवाल्याने मीडिया रिपोर्ट्समध्ये, टायगर आणि दिशा यांच्यातील ब्रेकअपचे कारण लग्न असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्याच्या मित्राच्या म्हणण्यानुसार, जॅकी श्रॉफ (Jackie Shroff) आणि त्यांची पत्नी आयशा श्रॉफ (Ayesha Shroff) वेगळे राहायला लागल्यापासून, टायगर दिशासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होता. या दोघांचे संबंध खूप दिवसांपासून होते आणि आता लग्न करावे, असे दिशाला वाटत होते. पण टायगर अजून लग्नासाठी तयार नव्हता. एका मित्राच्या हवाल्याने असे देखील सांगण्यात आले आहे की, दिशा टायगरशी याबद्दल बोलली होती. परंतु प्रत्येक वेळी त्याचे उत्तर ‘नाही’ असे होते.

टायगरवर नाराज नाही दिशा
टायगरच्या मित्राच्या म्हणण्यानुसार, दिशाने हे ब्रेकअप अतिशय सकारात्मक पद्धतीने घेतले आहे. ती टायगरवर रागावलेली नाही. त्याचबरोबर त्याने असेही म्हटले आहे की, काही काळानंतर दोघे पुन्हा एकत्रही येऊ शकतात.

काय म्हणाले जॅकी श्रॉफ?
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत जॅकी श्रॉफने दोघांच्या नात्यावर मौन तोडले होते. ते म्हणाले, ‘टायगर आणि दिशा नेहमीच मित्र होते आणि अजूनही आहेत. मी अजूनही त्यांना एकत्र बाहेर जाताना पाहतो. मी माझ्या मुलाच्या लव्ह लाईफवर लक्ष ठेवत नाही. मला त्यांच्या गोपनीयतेत ढवळाढवळ करायची नाही.” पण मला वाटते की तो खूप चांगला मित्र आहे. कामाव्यतिरिक्त त्यांना एकमेकांसोबत वेळ घालवायलाही आवडते, असेही ते यावेळी म्हणाले.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा