×

सलमान खानच्या ‘द बॅंग टूर’मध्ये दिशा पाटणीने केला ‘स्लो मोशन’ गाण्यावर धमाकेदार डान्स, व्हिडिओ झाला व्हायरल

मागील काही दिवसांपासून सलमान खान त्याच्या द बॅंग या टूरमुळे खूपच चर्चेत आहे. २०२० साली अभिनेत्री दिशा पाटनी देखील सलमानच्या या टूरमध्ये सामील झाली. त्यानंतर तिने दुबईमध्ये झालेल्या शोमध्ये ‘स्लो मोशन’ गाण्यावर धमाकेदार डान्स केला होता. ज्याचा व्हिडिओ तिने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून देखील शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये दिशाने अफलातून डान्स केला असून, तिच्या अदा पाहून फॅन्स घायाळ होत आहे. दिशाने तिच्या या डान्सने स्टेजवर आग लावत धमाका केला आहे. दिशाचा हा व्हिडिओ पाहून तिचे फॅन्स त्यावर जबरदस्त कमेंट्स करत आहे. या कमेंट्समधून तर एकाने तिला टायगर श्रॉफवर देखील प्रश्न विचारला.

 

हा व्हिडिओ इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करताना दिशाने कॅप्शनमध्ये लिहिले, “स्लो मोशन मध्ये खरतर माझा डान्स स्लो नाही तर फास्ट आहे.” दिशांच्या या कॅप्शनपेक्षा तिचा डान्स अमाप गाजत आहे. तिच्या एका फॅनने या व्हिडिओवर कमेंट करताना लिहिले, “दिशा तू आमची सकाळ खूपच चांगली बनवली.” तर दुसऱ्याने लिहिले, “टायगरसोबत डान्स का नाही केला?” मागील काही काळापासून दिशा आणि टायगर श्रॉफ एकमेकांना डेट करत असल्याचे सांगितले जात आहे. मात्र यावर या दोघांकडून अजूनपर्यंत कधीही अधिकृत माहिती दिली नाही.

दिशा पाटनीशिवाय या ‘द बॅंग टूर’मध्ये आयुष शर्मा, गुरु रंधावा, पूजा हेगड़े, सई मांजरेकर, सोनाक्षी सिन्हा, मनीष पॉल आदी कलाकार देखील सामील झाले आहे. दुबईमध्ये एक्स्पोमध्ये सर्वच कलाकारांनी धमाकेदार परफॉर्मन्स दिले. दिशाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्टर शेअर करत लिहिले, “द बॅंग टूर -रीलोडेड २५ फेब्रुवारी २०२२ रोजी एक्स्पो २०२० दुबईमध्ये येत आहे. तुमचे तिकिट्स बुक करा.” सध्या सोशल मीडियावर सलमान खानच्या या टूरचा एक व्हिडिओ खूपच व्हायरल होत असून, या व्हिडिओमध्ये सलमान खान स्टेजवर परफॉर्मन्स देत असून, त्याची एक चाहती त्याला पाहून खूपच रडताना दिसत आहे.

हेही वाचा

Latest Post