Wednesday, July 3, 2024

Video: शूटिंगदरम्यान मिळालेल्या वेळेचा दिशाने केला चांगला वापर, लावले ‘या’ गाण्यावर जोरदार ठुमके

बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी या ना त्या कारणामुळे नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते. ती अनेकदा तिच्या आगामी चित्रपटांशी संबंधित माहिती, तसेच दैनंदिन जीवनात घडत असलेल्या गोष्टी तिच्या चाहत्यांसोबत शेअर करत असते. दिशा तिच्या चाहत्यांना प्रभावित करण्याची कोणतीही संधी सोडत नाही. अशातच तिचा नवीन व्हिडिओ चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

दिशाने नुकताच तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर एक नवीन डान्सचा व्हिडिओ शेअर केला आहे. तिने शूटिंग दरम्यान मिळालेल्या वेळेत हा व्हिडिओ तयार केल्याचे दिसते. या व्हिडिओमध्ये दिशा सेटवरील काही मुलींसोबत निकी मिनाजच्या ‘हायस्कूल’ या गाण्यावर परफॉर्म करताना दिसत आहे.

दिशा पटानीचा व्हिडिओ व्हायरल
दिशा या व्हिडिओमध्ये मस्तीच्या मूडमध्ये दिसत आहे. तिने या व्हिडिओमध्ये निळ्या रंगाचा टॉप आणि पँट घातली आहे. हा व्हिडिओ शेअर करत दिशाने कॅप्शनमध्ये “सेटवर मुली” असे लिहिले आहे. तिच्या या व्हिडिओला आतापर्यंत ४५ लाखांपेक्षाही अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच, ६ लाखांपेक्षाही अधिक लाईक्सचाही वर्षाव झाला आहे.

दिशाच्या चित्रपटांबाबत थोडंसं
दिशा शेवटची ‘राधे: योर मोस्ट वाँटड भाई’ या चित्रपटात सलमान खानसोबत दिसली होती. सलमान खानसोबत तिचा हा दुसरा चित्रपट होता. यापूर्वी ती ‘भारत’ या चित्रपटात देखील त्याच्यासोबत दिसली होती. दिशाच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचे झाल्यास, ती ‘खलनायक २’ या चित्रपटामध्ये दिसणार आहे. जॉन अब्राहम, आदित्य रॉय कपूर आणि तारा सुतारिया हे कलाकारदेखील या चित्रपटात झळकणार आहेत. याव्यतिरिक्त ती एकता कपूरच्या ‘कतिना’ (ktina) चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट एकता कपूरच्या जीवनावर आधारित आहे.

दिशाची कारकीर्द
दिशाच्या कारकिर्दीबाबत बोलायचं झालं, तर तिने सन २०१६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटातून बॉलिवूड पदार्पण केले होते. हा चित्रपट चांगलाच गाजला. त्यानंतर तिची लोकप्रियता कमालीची वाढली. यानंतर तिने ‘बागी २’, ‘मलंग’, ‘भारत’, ‘बागी ३’, ‘राधे’ यांसारख्या अनेक चित्रपटात झळकली.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-लग्नाआधी झालेल्या प्रीवेडिंग पार्टीत अंकिता आणि विकीने केला धमाकेदार डान्स, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

-हॉट कपल असणाऱ्या कॅटरिना आणि विक्की यांच्यामध्ये ‘बार्बी डॉल’ आहे कमाईच्याबाबतीत सर्वात पुढे

-बिकिनी घालून पोहणाऱ्या ‘या’ कोरिओग्राफरने लावली पाण्यात आग

हे देखील वाचा