Monday, July 8, 2024

बिकिनी टॉप आणि फ्लोरल स्कर्टमध्ये दिशा पटानी दिसली पूलच्या किनाऱ्यावर फिरताना

कलाकार जेव्हा कधी त्यांना वेळ मिळतो तेव्हा ते स्वतःला, कुटुंबाला वेळ देत सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी विविध ठिकणी जातात. सध्या बॉलिवूडमध्ये किंबहुना संपूर्ण मनोरंजनसृष्टीमधे मालदीवजला जाऊन सुट्यांचा आनंद घेताना अनेक कलाकारांना दिसत आहे. अनेक कलाकार त्यांचे मालदीवजच्या सुट्यांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहेत. त्यातच अभिनेत्री दिशा पटानी देखील तिच्या मालदीवजच्या सुटयांचा एक थ्रो बॅक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.

दिशाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तिचा एक अनसीन व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तिने तपकिरी रंगाचा बिकिनी टॉप आणि शॉर्ट फ्लोरल स्कर्टमध्ये दिसत असून, पूलच्या किनाऱ्यावर ती एन्जॉय करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये तिची मादक चाल आणि आकर्षक लूक सर्वानाच घायाळ करत आहे. तिचे मोकळे केस तिच्या लुकला अधिकच लक्षवेधी बनवत आहे. हा व्हिडिओ शेअर करताना तिने लिहिले, ‘मिसिंग’ काही दिवसांपूर्वी दिशा तिचा कथित बॉयफ्रेंड असलेल्या टायगर श्रॉफसोबत मालदीवला गेली होती. कदाचित हा तेव्हाच व्हिडिओ असावा जो तिने आता पोस्ट केला आहे. (disha patani seen chilling on the poolside)

या व्हिडिओमधला दिशाचा ग्लॅमरस अंदाज सर्वांना चांगलंच आवडत आहे. दिशाचे व्हिडिओ, फोटो तिने पोस्ट केल्यानंतर काही वेळातच व्हायरल होतात. दिशाचा बोल्ड आणि ग्लॅमरस लूक नेहमीच तिचा फॅन्सच्या पसंतीस उतरत असतो.

दिशाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर तिचा सलमान खानसोबतचा ‘राधे’ सिनेमा प्रदर्शित झाला होता. आता लवकरच ती ‘एक व्हिलन रिटर्न’मध्ये दिसणार आहे. सोबतचा ती एकता कपूरच्या KTINA या सिनेमात देखील झळकणार आहे. दिशाला ‘एम एस धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ सिनेमातून मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळाली. खूपच कमी काळात तिने तिचे स्थान स्वबळावर या क्षेत्रात निर्माण केले आहे. आज तिची गणती टॉपच्या अभिनेत्रींमध्ये होते. तिला लाखो लोकं सोशल मीडियावर फॉलो करतात.

 

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-पुरुष कलाकारांना जास्त फी मिळण्यावर बोलल्या नीना गुप्ता; म्हणाल्या, ‘पुरुषांच्या या जगात स्त्रियांना…’

-‘बिग बॉस’च्या घराबाहेर राखी सावंतला चावला कुत्रा; म्हणाली, ‘मी पण त्याला चावणार’

-‘पोन्नियन सेलवन’ सिनेमातील ऐश्वर्याचा फोटो लीक; अभिनेत्री दिसली ‘या’ अवतारात

हे देखील वाचा