Wednesday, October 15, 2025
Home बॉलीवूड काय सांगता! जिममध्ये दोन मुलांनी काढली दिशा पटानीची छेड, मग पुढे जे झालं…

काय सांगता! जिममध्ये दोन मुलांनी काढली दिशा पटानीची छेड, मग पुढे जे झालं…

बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी (Disha Patani) तिच्या फिटनेसकडे खूप लक्ष देते. ती अनेकदा तिचे वर्कआउटचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. ज्याला पाहून तिचे चाहतेही प्रेरित होतात. अलीकडेच, अभिनेत्रीने तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे, ज्यामध्ये ती मुलांना मारहाण करताना दिसत आहे. दिशाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

खरं तर, दिशाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती जिममध्ये जाताना दिसत आहे. यादरम्यान, दोन मुले दिशाचा विनयभंग करू लागतात आणि त्यानंतर दिशा जे करते ते सर्वांनाच आश्चर्यचकित करणारे आहे. तिने दोन्ही मुलींना बेदम मारहाण केली. हा व्हिडिओ शेअर करत दिशाने लिहिले, “जिममधील एक सामान्य दिवस.” या व्हिडिओमध्ये दिशाचे अप्रतिम मार्शल आर्ट्स पाहायला मिळत आहेत. (disha patani shared a video from gym and show her martial arts skills)

दिशाच्या या व्हिडिओवर टायगर श्रॉफची (Tiger Shroff) बहीण कृष्णा श्रॉफ (Krushna Shroff) हिने कमेंट करत ‘टू गुड’ असे लिहिले, तर अनेकांना तिची ही स्टाईल खूप आवडली आहे. एका यूजरने कमेंट करत लिहिले की, ” नक्कीच टायगरकडून शिकली असावी.” त्याच वेळी, इतर युजर्स देखील दिशाचे जोरदार कौतुक करत आहेत.

दिशा पटानीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर ती लवकरच सिद्धार्थ मल्होत्रासोबत (Sidharth Malhotra) ‘युद्ध’मध्ये दिसणार आहे. याशिवाय ती ‘एक व्हिलन २’मध्ये अर्जुन कपूर (Arjun Kapoor), जॉन अब्राहम (John Abraham), आणि तारा सुतारियासोबत (Tara Sutaria) दिसणार आहे. दिशा प्रभास (Prabhas) अभिनित ‘प्रोटेक्ट के’ या चित्रपटाचा देखील एक भाग आहे.

हे देखील वाचा