बॉलिवूड म्हटलं की शरीर फिट ठेवणं याला प्राधान्य आलंच. परंतु अनेकदा भूमिकेच्या गरजेनुसार कलाकारांना आपलं वजन वाढवावं आणि कमी देखील करावं लागतं. बहुतेकदा वजन हे कमीच ठेवावं लागतं. परिणामी आपल्याला बरेच अभिनेते जिममध्ये घाम गाळताना दिसतात. पण जरा थांबा गेल्या काही वर्षांमध्ये या अभिनेत्यांबरोबर आपल्याला अनेक अभिनेत्री देखील जिममध्ये वर्कआऊट करताना दिसत आहेत.
अनेकदा या अभिनेत्री त्यांचे जिममधील फोटोज किंवा वर्कआऊट करतानाचे व्हिडिओज त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंट्सवर शेअर करतात. अशाच काही अभिनेत्रींमध्ये एक नाव प्रामुख्याने घ्यावं लागेल ते म्हणजे दिशा पाटणी हिचं! दिशासुद्धा तिचे वर्कआऊट व्हिडिओज नेहमीच सोशल मीडियावर शेअर करत असते. असाच आणखीन एक व्हिडिओ तिने शेअर केला आहे. ज्याला लाखोंमध्ये लाईक्स येत आहेत आणि व्हिडिओ हळू हळू व्हायरल देखील होऊ लागला आहे. चला तर मग पाहुयात दिशा पाटणीचा हा नवा व्हिडिओ!
दिशा पाटणीने तिचा वर्कआउट व्हिडिओ नुकताच तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती पाठीचा व्यायाम करताना दिसतेय. व्हिडिओमध्ये ती जिममध्ये घाम गाळत असल्याचे दिसून येत आहे. या व्हिडिओमध्ये दिशाची परिपूर्ण पाठ पाहून चाहते तिचं कौतुक करतायत. तिच्या टोन्ड बॉडीचंही लोक कौतुक करतायत.
दिशाचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. अभिनेत्री कियारा अडवाणीने देखील या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली आहे. तिने या व्हिडिओवर आगीचा इमोजी पाठवून तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. याशिवाय चाहत्यांनी ते तिच्या या व्हिडिओवर लाईक्सचा पाऊसच पाडला आहे. दिशा आणि कियारा यांनी एम एस धोनीः द अनटोल्ड स्टोरी या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. या चित्रपटात बॉलिवूडचा दिवंगत अभिनेता सुशांतसिंग राजपूत याने मुख्य भूमिका साकारली होती.
अलीकडेच दिशा पाटणी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते. दिशा तिचा तथाकथित प्रियकर टायगर श्रॉफसह मालदीवमध्ये नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आली होती. तेथून तीने आपली बोल्ड छायाचित्रेही शेअर केली. यापूर्वीही दोघे एकाच वेळी मालदीवमध्ये पोहोचले होते. सद्या तिच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर दिशा ‘राधे: युअर मोस्ट वॉन्टेड भाई’ मध्ये सलमान खानसोबत झळकणार आहे. या चित्रपटात जॅकी श्रॉफ देखील एक महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहेत.