पारा चढला..!! दिशा पटानीने पुन्हा केले चाहत्यांना क्लिन ‘बोल्ड’, बिकिनीतील फोटोंचा सोशलवर धुमाकूळ


बॉलिवूडमधील नावाजलेली अभिनेत्री ‘दिशा पटानी’ ही आपल्या अभिनयामुळे आणि स्टाईलमुळे सर्वत्र प्रसिद्ध आहे. तिने तिच्या अभिनयाच्या जोरावर सगळीकडे नाव कमवले आहे. परंतु तिच्या अभिनयासोबतच दिशा तिच्या ग्लॅमरस स्टाईलसाठी देखील खूप प्रसिद्ध आहे. तिच्या या ग्लॅमरस फोटोजमुळे ती नेहमीच प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय बनते. दिशा पटानीचा नुकताच एक फोटो सोशल मीडियावर खूपच धुमाकूळ घालताना दिसत आहे.

या फोटोमध्ये दिशा एका स्विमिंग पुलमध्ये उभी आहे. स्विमिंग पूलमध्ये ती फोटो साठी पोज देत आहे. या फोटोत दिशाने पिंक कलरची ‘बिकनी’ घातली आहे. त्यामध्ये तिचा लूक देखील खूपच ग्लॅमरस दिसत आहे.

दिशा पटानीने तिचा हा फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या फोटोला आता पर्यंत 6 लाखापेक्षाही जास्त लाईक्स मिळाले आहे. या फोटोमध्ये ती पिंक कलरची बिकनी घालून स्विमिंग पूलमध्ये सन बाथ घेताना दिसत आहे. दिशाच्या या फोटोला सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांकडून कमेंटचा वर्षाव होताना दिसत आहे आणि सोबतच दिशाचे खूप कौतुक देखील करत आहेत. ही काही तिची फोटो पोस्ट करायची पहिली वेळ नाही तर या आधी देखील दिशाने असे ग्लॅमरस फोटो शेअर करून सगळ्या प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. याआधी तिने समुद्राच्या किनाऱ्यावर व्हाईट कलरची बिकनी घालून फोटो शेअर केले होते.

दिशा पटानीच्या करिअरबद्दल बोलायचे झाल्यास, तिने ‘मलंग’ या चित्रपटात या आधी काम केले होते. या चित्रपटात तिच्यासोबत ‘आदित्य रॉय कपूर’, ‘अनिल कपूर’ आणि ‘कुणाल खेमू’ हे मुख्य भूमिकेत होते. दिशा लवकरच सलमान खानसोबत ‘राधे : युआर मोस्ट वॉन्टेड’ या चित्रपटात देखील दिसणार आहे. तीचा हा चित्रपट मागच्या वर्षी ‘ईद’ च्या मुहूर्तावर रिलीज होणार होता परंतु कोरोनामुळे या चित्रपटाची तारीख लांबवली गेली. याआधी दिशाने सलमान खानच्या ‘भारत’ या चित्रपटात देखील त्याच्यासोबत काम केले आहे. त्यांच्या केमेस्ट्रीला देखील प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला होता.


Leave A Reply

Your email address will not be published.