Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

पगारपाणी काय मिळाला नाही! दिशा वकानी सोडतीये तारक मेहता का उल्टा चष्मा मालिका?

टेलिव्हिजनवरील सगळ्यात प्रचलित आणि आवडणारी मालिका म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’. या मालिकेतील पात्र आणि त्यांच्या विनोदाने सगळ्यांचे आयुष्य हास्यमय करून टाकले आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्राची एक वेगळी ओळख आहे. मागच्याच वर्षी या मालिकेत अनेक नवीन पात्र आलेत ,पण २०१७ पासून एका पात्राची सगळेजण उत्सुकतेने वाट बघत आहेत. ती म्हणजे या मालिकेतली दया बेन म्हणजेच दिशा वकानी. दिशा वकानीने २०१७ साली मॅटरनिटी लिव्ह घेतली होती. त्यानंतर ती अजूनही या मालिकेमध्ये परत आलेली नाहीये. पण मागील काही दिवसापासून दिशा वकानी या मालिकेत परत येणार नाही याची सर्वत्र चर्चा चालू आहे. त्यामुळे तिचे फॅन्स खूप नाराज झाले आहेत. पण या गोष्टीची घोषणा अजूनही या मालिकेच्या निर्मात्यांनी केलेली नाहीये. मात्र आता सूत्रांच्या मते तिचे मालिकेमध्ये परत न येण्याचे कारण जाहीर झाले आहे.

तारक मेहता का उल्टा चश्माचे चाहते हे जाणून घेण्यास उत्सुक आहे की, दिशा आई बनल्यानंतर या कार्यक्रमात परत का येणार नाहीये?? पण सगळ्यांच्या या प्रश्नाला अखेर उत्तर मिळाले आहे. एका वृत्तपत्राच्या माहितीनुसार, कमी पगार मिळत असल्यामुळे तिने ही मालिका सोडली आहे. तिला मनासारखा पगार न मिळाल्याने तिने ही मालिका सोडल्याची माहिती मिळत आहे.

दिशा या मालिकेमध्ये काम करण्यासाठी १.२५ लाख रुपये प्रत्येक भागाचे घेत होती. २०१७ पासून ती सुट्टीवर गेली आहे, तेव्हापासून सगळेजण ती परत कधी येणार आहे याची वाट बघत आहेत. त्यांना वाटले काही दिवसांनी दिशा परत येईल पण तसे काही झाले नाही. दिशाने मालिकेच्या निर्मात्यांना तिचा पगार वाढवण्यास सांगितले होते. तिने निर्मात्यांकडे १.५० लाख रुपये प्रत्येक भागासाठी मागितले होते.

तसेच दिशाला अकरा ते सहा या वेळेतच तिचे शूट असावे अशी अट होती. तिने सांगितले होते की, मी सहा वाजता पॅकअप करेन, जेणेकरून मला घरी जाऊन तिच्या मुलीसोबत वेळ घालवता येईल. परंतु या क्षेत्रात या वेळेत शूटिंग पार पडणे शक्य नाहीये. तिच्या‌ या सगळ्या अटी मालिकेच्या निर्मात्यांनी मान्य केल्या नाही. त्यामुळे तिने मालिका सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या मालिकेच्या निर्मात्यांकडून अजूनही कोणतीही औपचारिक घोषणा झालेली नाहीये.

हे देखील वाचा