नुकताच दाक्षिणात्य इंडस्ट्रीचा सुपरस्टार सुर्याचा ‘जय भीम’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत असून, हा चित्रपट प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन आणि मेगास्टार कमल हसन यांनीही या सिनेमातील सुर्याच्या उत्कृष्ट कामाबद्दल त्याचे कौतुक करत अभिनंदन केले आहे. हा चित्रपट देखील वादापासून वाचू शकला नाही.
प्रत्येक घटनेवर सोशल मीडियाच्या माध्यमातून आपले मत मांडणारे प्रकाश राज तसे पाहिले तर नेहमीच त्यांच्या वक्तव्यांमुळे सोशल मीडियावर ट्रोल होत असतात. आता प्रकाश राज किंबहुना संपूर्ण चित्रपटच त्यांच्या या सिनेमातील एका सीनमुळे चर्चेत आला आहे. या चित्रपटात एक असा सीन आहे, ज्यामध्ये प्रकाश राज एका व्यक्तीला कानाखाली मारतात, तेव्हा ती व्यक्ती कानाखाली मारण्याचे कारण हिंदीत विचारत म्हणते, “मला का मारले” तेव्हा प्रकाश राज त्याला हिंदीत का बोलला तामिळमध्ये बोल असे म्हणतात. ती व्यक्ती आधी हिंदीत बोलत होती. या सीनवरून एकच गोंधळ उडाला आहे.
प्रसिद्ध चित्रपट समीक्षक रोहित जैस्वाल म्हणाले की, यामुळे त्यांचे हृदय तुटले. त्यांनी ट्वीटरवर लिहिले की, “आम्ही तमिळ चित्रपटांची मनापासून वाट पाहतो. आम्ही तमिळ चित्रपटांना इतकं समर्थन देतो की, हे चित्रपट संपूर्ण भारतात प्रदर्शित करावे अशी आमची नेहमीच मागणी असते. या सगळ्याच्या बदल्यात आम्हाला थोडं प्रेम हवं आहे, हा चित्रपट पाहिल्यानंतर माझं हृदय तुटलं. चित्रपटाला या सीनची अजिबात गरज नव्हती. मला आशा आहे की, निर्माते तो सीन काढून टाकतील.”
या चित्रपटात १९९५ साली तामिळनाडूमध्ये झालेला जातीय छळ आणि पोलिसांची क्रूरता दाखवण्यात आली आहे. हा चित्रपट सत्य घटनांवर आधारित आहे… म्हणजे दलित-आदिवासींवर ज्या प्रकारची क्रूरता व्हायची, तीच क्रूरता आजही घडते. हे यामध्ये दाखवण्यात आले आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-सौंदर्यवती ऐश्वर्याने कारकिर्दीत आपल्याच पायावर मारून घेतला धोंडा, केल्या ‘या’ ८ मोठ्या चुका?
-सलमानसोबत ब्रेकअपनंतर ‘अशी’ बनली ऐश्वर्या बच्चन कुटुंबाची सून, रोचक आहे त्यामागची कहाणी