Monday, July 1, 2024

आपल्या ‘बेस्ट कंपनी’सोबत मस्ती करताना दिसली समंथा, व्हिडिओ शेअर करून लिहिली ‘ही’ खास गोष्ट

चित्रपसृष्टीतील अनेक कलाकार सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. ते नेहमीच आपल्या पोस्टद्वारे चाहत्यांबरोबर काही ना काही शेअर करत असतात. त्याचप्रमाणे दाक्षिणात्य चित्रपटातील सुप्रसिद्ध अभिनेत्री समंथा अक्किनेनी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. नेहमीच ती आपले व्हिडिओ आणि फोटो चाहत्यांबरोबर शेअर करत असते. काही दिवसांपासून ती आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेचा विषय ठरत आहे. अशी देखील माहिती समोर आली आहे की, समंथा आणि तिचा पती नागा चैतन्य घटस्फोट घेऊ शकतात. यामुळे नेटकऱ्यांच्या नजरा समंथाच्या सोशल मीडिया अकाऊंटवर आहेत. नुकताच समंथाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. त्या व्हिडिओमध्ये ती तिच्या ग्रूपसोबत दिसत आहे. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

समंथाने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यात ती सायकल चालवताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये तिच्यासोबत तिचे बरेच मित्र दिसत आहेत. समंथाने हा व्हिडिओ शेअर करत एक सुंदर कॅप्शन देखील दिले आहे. तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, “पावसात सायकलिंग आणि तेही आपल्या बेस्ट कंपनीसोबत.” तिच्या या व्हिडिओला आतापर्यंत ४ मिलियन व्ह्यूज आणि ३ लाखांपेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत. नेहमीप्रमाणे, तिचे चाहते यावर खूप प्रतिक्रिया करत आहेत.

काही दिवसांपूर्वीच समंथा तिरुपती बालाजीला गेली होती. समंथा तिरुपती बालाजीला पोहोचल्यानंतर माध्यमांनी तिला तिच्या आणि नागा चैतन्याच्या घटस्फोटासंबंधित प्रश्न विचारले. त्याचवेळी या प्रश्नांवर अभिनेत्रीचा पारा चढला आणि तिने त्यांना तेलुगू भाषेत स्पष्टपणे उत्तर दिले. ती म्हणाली की, “मी मंदिरात आली आहे आणि यावेळी तुम्ही हे प्रश्न विचारत आहात, तुमच्याकडे बुद्धी आहे का?”

समंथाच्या घटस्फोटाची माहिती मिळाल्यानंतर प्रत्येकजण त्याबद्दल काही माहिती मिळते का, यावर लक्ष ठेऊन आहेत. अलीकडेच, कौटुंबिक डिनर पार्टीमध्ये समंथा उपस्थित नव्हती. त्यावेळी देखील तिला अनेक प्रश्नांनी घेरले होते. जर नागा चैतन्य आणि समंथा यांच्यातील नातेसंबंध ठीक असते, तर या चर्चांना उधाण आलेच नसते. त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चेमुळे ती तेथे उपस्थित नसल्याने चर्चेचा विषय ठरली. ती आणि तिचा पती नागा चैतन्य यांचा घटस्फोट होऊ शकतो, अशी चर्चा बऱ्याच दिवसांपासून सुरू असली, तरीही या दोघांनीही यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळेच ते घटस्फोटाबाबत काय निर्णय घेतील हा येणारा काळच सांगेल.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-धक्कादायक! ‘बिग बॉस १५’मध्ये सामील होण्यापूर्वीच ‘या’ स्पर्धकाला पॅनिक अटॅक; सुरू होण्यापूर्वीच सोडला शो

-तरुणांना मागे टाकत ‘बिग बॉस’ जिंकली होती ‘ही’ मिश्यांमधील वृद्ध महिला, पाहून तुम्हीही व्हाल अचंबित

-बोल्ड फोटोंमुळे राधिका आली होती ट्रोलर्सच्या निशाण्यावर; ‘माझं शरीर…’, म्हणत सुनावले त्यांना खडेबोल

हे देखील वाचा