Wednesday, October 30, 2024
Home टेलिव्हिजन Divya Agarwal Pregnancy : लग्नापूर्वीच प्रेग्नेंट…दिव्या अग्रवाल भडकली, अफवांवर सोडलं मौन

Divya Agarwal Pregnancy : लग्नापूर्वीच प्रेग्नेंट…दिव्या अग्रवाल भडकली, अफवांवर सोडलं मौन

टीव्ही अभिनेत्री दिव्या अग्रवाल(Divya Agarwal) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळं चर्चेत आहे. लग्नापूर्वीच दिव्या गरोदर असल्याच्या चर्चेने उत आला आहे. दरम्यान, दिव्याने एक पोस्ट शेअर करत अफवा पसरवणाऱ्यांना चोख उत्तर दिले आहे.

काही दिवसांपूर्वीच, दिव्या अग्रवालने (Divya Agarwal) मराठी बिझनेसमन अपूर्व पाडगावकरसोबत लग्नगाठ बांधली. तिच्या लग्नाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले.

फोटो पाहून तिच्या चाहत्यांमध्ये ती गरोदर असल्याची चर्चा रंगली. लग्नाआधीच गरोदर असल्यामुळे तिने लग्न केले, अशा अनेक कमेंट्स पास होवु लागल्या. काही युजर्सनी दिव्याने लग्नात आपलं पोट झाकेल असे कपडे परिधान केले असा दावा केला. अशातच आता अभिनेत्रीने या सुरु असलेल्या चर्चेवर मौन सोडलं आहे.

दिव्याने (Divya Agarwal) आपल्या इंस्टा स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये तिनं अफवा पसरवणाऱ्यांना चांगलचं फटकारलं आहे. ‘तू इतकी जाड का आहेस, तू इतकी पातळ का आहेस, तू इतकी काळी का आहेस, तू इतकी बुटकी का आहेस, तू इतकी उंच का आहेस?’…… त्यापेक्षा फक्त म्हणा, ‘तू सुंदर दिसतेस.’ आणि जा….. नेहमी फालतू बोलायची गरज नसते. अशा आशयाची स्टोरी शेअर करत अभिनेत्रीने सर्वांची बोलती बंद केली.

दिव्या.

दिव्याने एका मुलाखतीत सांगितले होते की, जेव्हा तिने अपूर्व पाडगावकरला पाहिले तेव्हापासून तिला त्याच्याशी लग्न करायचे होते. अपूर्व कमिटमेंटसाठी तयार नव्हता, म्हणून २०१८ मध्ये ते वेगळे झाले, परंतु काही काळाने दोघे पुन्हा एकत्र आले.

अभिनेत्री दिव्या अग्रवालने ‘MTV ‘Splitsvilla 10’, ‘Ace of Space 1’ आणि ‘Big Boss OTT सीझन १’ सारख्या शोमधून लोकप्रियता मिळवली. ‘रागिनी एमएमएस २’ या हॉरर चित्रपटातही तिने आपल्या अभिनयाची जादू दाखवली. ‘बिग बॉस ११’ मधील प्रियांक शर्मासोबतचे तिचे वाद आणि ब्रेकअप पोस्ट यांची बरीच चर्चा झाली. त्यानंतर वरुण सूदसोबत डेटिंग आणि ब्रेकअपच्या बातम्यांमुळे ती पुन्हा लाइमलाइटमध्ये आली होती.

हेही वाचा:

Naseeruddin Shah: …अन् चाहत्यांवर भडकले नसीरुद्दीन शाह; व्हिडीओ व्हायरल

Bhumi Pednekar | ‘खूप कमी चित्रपटांमध्ये महिलांना समाजात बदल घडवण्याची संधी मिळते’, भूमी पेडणेकरने केला मोठा खुलासा

author avatar
tdadmin

हे देखील वाचा