Sunday, March 15, 2026
Home अन्य ‘बिग बॉस ओटीटी’मध्ये दिव्याने सांगितले वडिलांना गमावण्याचे दु:ख; म्हणाली, ‘मला जरा मन:शांती…’

‘बिग बॉस ओटीटी’मध्ये दिव्याने सांगितले वडिलांना गमावण्याचे दु:ख; म्हणाली, ‘मला जरा मन:शांती…’

बिग बॉसच्या घरात आपण अनेक गोष्टी बदलताना पाहतो. मग ते स्पर्धकांचे एकमेकांसोबत नाते जोडताना असो किंवा नाती बिघडताना. या घरात आल्यानंतर काही स्पर्धक खूप मजबूत होतात, तर काही रागाच्या भरात आपलं भान हरवून बसतात. यावर्षीही बिग बॉस ओटीटीच्या घरात काहीजणांची नाती फुलताना पहिली आहेत, तर काहींची बिघडताना. या घरात स्पर्धक दिव्या अग्रवालला सुरुवातीला कोणताही साथीदार मिळाला नाही आणि पहिल्या आठवड्यातच ती नामांकनात आली. आता आपण तिला सर्वात मजबूत स्पर्धक असल्याचे पाहत आहोत. घरात तिची नवीन जोडी झीशानसोबत झाली आहे. दिव्या अग्रवाल स्वत: आणि तिच्या जोडीदारासाठी घरात उभी राहिली होती, त्यानंतर लोक सोशल मीडियावर तिचे कौतुक करत आहेत.

दिव्या अग्रवालचे दु:ख
गेल्या आठवड्यात शोमध्ये आपण पाहिले की, ‘संडे का वार’मध्ये करण जोहरचे सर्वात जास्त कोणाला बोलणी खावी लागली असतील, तर ती दिव्या अग्रवाल आणि तिचा जोडीदार झीशानला. जेव्हा करणने दिव्याची शाळा घेतली, तेव्हा तिच्या चाहत्यांना ते अजिबात आवडले नाही आणि मग चाहत्यांनी त्याची शाळा सोशल मीडियावर घेतली. आता शोमधील आणखी एक क्लिप समोर आली आहे. ज्यात दिव्या अग्रवालचा संयम सुटताना दिसत आहे आणि तिच्या वडिलांना गमावल्याची वेदना जाणवत आहे. (Divya Agarwal wants peace of mind in Bigg Boss’s house, she said)

मला मन:शांती हवी
दिव्या अग्रवाल म्हणाली की, “गेल्या आठवड्याच्या शेवटी जे घडले त्यामुळे घरातील सर्वच सदस्य माझ्या विरोधात गेले आहेत आणि आता मला जरा मन:शांती हवी आहे. कारण जेव्हा माझ्या वडिलांचे निधन झाले, तेव्हापासून मी मानसिकदृष्ट्या शांत नाहीये.”

मी प्रत्येक स्त्रीसाठी लढू शकत नाही
दिव्या अग्रवाल पुढे म्हणाली की, “मी प्रत्येक स्त्रीसाठी सतत लढू शकत नाही, जेव्हा मी स्वतःशी लढत असते. झीशान हा माझा नवीन जोडीदार आहे. मी शक्य तितक्या प्रेमाने त्याला या गोष्टी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे आणि ते कोणालाही दाखवण्यासाठी केलेल्या नाहीत. मी अक्षराशी देखील बोलले आणि ती माझी मैत्रीण आहे. भूतकाळात जे काही घडले त्यासाठी मी तिची माफीही मागितली आहे. तसेच मी असे काही बोलले नसल्याचेही तिला सांगितले आहे.”

मला आधी स्वतःचे रक्षण करायचे आहे
दिव्या अग्रवाल पुढे म्हणाली की, “मी झीशानला समजावले, तेव्हा तो इथे आला आणि सॉरी म्हणाला. तसेच त्यानंतरही तो अक्षरासाठी बोलत देखील होता. म्हणून मी त्याला फक्त इतकचं सांगितले की, तू जिथे चुकला होतास तिथे तू सॉरी बोललास. जिथे अक्षरा चुकीची आहे, तर तिला बिग बॉसने सांगितले आहे. हा आपला विजय आहे.”

यावर करण तिला म्हणाला की, “दिव्या बघ तुझी स्वतःची मतं आहेत, तू म्हटल्याप्रमाणे तू प्रत्येकाशी लढू शकत नाहीस. जर तुझं कनेक्शन असेल, तर तू प्रत्येकाची लढाई लढू शकत नाहीस कारण तू स्वतः लढत आहेस.” दिव्या यावर उत्तर देत म्हणाली की, “मला आधी स्वतःचे संरक्षण करायचे आहे, तरच मी इतरांचे करू शकेल.”

चाहत्यांनी सोशल मीडियावर दिला दिव्याला पाठिंबा
करण जोहर आणि दिव्या अग्रवाल यांच्यात ‘संडे का वार’ मध्ये झालेल्या वादानंतर सोशल मीडियावर लोक दिव्याला पाठिंबा देत आहेत. इतकेच नव्हे तर ‘We Stand By Divya’ चा ट्रेंड सुरू केला. दिव्याने दिलेल्या मताचे समर्थन करत लोकांनी करण जोहरवर टीका सुरू केली आणि शमिताला पाठिंबा दिल्याबद्दल त्याला भेदभाव करणारा देखील म्हटले.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-राडाच ना! ईशा गुप्ताने केली बोल्डनेसची सीमा पार, बिकिनी फोटो जोरदार व्हायरल

-‘धक धक गर्ल’च्या अदांनी पुन्हा एकदा चुकवला चाहत्यांचा काळजाचा ठोका; लेटेस्ट फोटोशूटने केला इंटरनेटवर राडा

-‘कंचना ३’ फेम अभिनेत्रीचा गोव्यामध्ये संशयास्पद मृत्यू; परंतु ‘या’ कारणामुळे होत नाहीये पोस्टमॉर्टम

हे देखील वाचा