Monday, July 8, 2024

दिवंगत अभिनेत्री दिव्या भारतीच्या वडिलांचे निधन, पती साजिद नाडियाडवाला यांनी दिली शेवटच्या क्षणापर्यंत साथ

हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेत्री आणि खूप कमी वयात यश मिळवलेल्या दिव्या भारतीला आज सगळेच ओळखतात. खूप कमी वयात तिने या जगाचा निरोप घेतला होता. अशातच ३० ऑक्टोबर, २०२१ रोजी दिव्याचे वडील ओम प्रकाश भारती यांचे देखील निधन झाले. त्यांच्या अंतिम संस्कारावेळी चित्रपट निर्माते आणि दिव्या भारतीचे पती साजिद नाडियाडवाला आले होते. दिव्याच्या मृत्यूनंतर साजिद यांनीच त्यांच्या आई-वडिलांना सांभाळले आणि त्यांना आधार दिला.

साजिद अगदी शेवटच्या क्षणापर्यंत दिव्याच्या आई-वडिलांसोबत होते. तिच्या मृत्यूनंतर काही दिवसातच साजिद नाडियाडवाला यांनी दुसरे लग्न केले होते. दिव्याने १९९२ मध्ये साजिद यांच्याशी विवाह केला होता. लग्नाच्या एका वर्षातच दिव्याचा मृत्यू झाला. बिल्डिंगवरून खाली पडून तिचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर तिच्या चाहत्यांना खूप दुःख झाले होते. दिव्याच्या मृत्यूनंतर साजिद यांचे कुटुंब देखील दुःखात होते.

त्यानंतर त्यांनी दिव्याच्या कुटुंबाला खूप आधार दिला होता. अशातच साजिद यांची दुसरी पत्नी वरदा खानने इंस्टाग्रामवर दिव्या यांच्या वडिलांचा फोटो शेअर केला आहे. या एका फोटोमध्ये दिव्या यांच्या वडिलांसोबत साजिद नाडियाडवाला, तर दुसऱ्या फोटोत वरदा खान दिसत आहे. हा फोटो शेअर करून तिने लिहिले आहे की, “मी तुम्हाला खूप मिस करेल बाबा.” (Divya Bharti’s father passed away Sajid nadiyadwala was with him in last time)

दिव्या भारतीने १९९२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘विश्वात्मा’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. तिच्या निधनानंतर १९९३ मध्ये तिचा ‘शतरंज’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.

त्यांनी १० मे, १९९२ साली मुस्लिम पद्धतीने साजिद नाडियाडवाला यांच्याशी विवाह केला होता, पण अगदी एक वर्षच त्यांचा संसार झाला. अशातच तिच्या वडिलांचा मृत्यू झाल्याने बॉलिवूडमधील अनेक कलाकार त्यांना श्रद्धांजली अर्पण करत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-शाहरुख खानने खरेदी करण्यापूर्वी ‘हे’ होते मन्नतचे नाव, तब्बल ‘एवढ्या’ कोटींना खरेदी केलाय त्याने बंगला

-‘ …तू माणूस म्हणून बी किंग हाय’ वाढदिवशी मराठमोळ्या किरण मानेने भन्नाट अंदाजात दिल्या शाहरुख खानला शुभेच्छा

-जेव्हा सर्वांसमोर शाहरुखला ‘आय लव्ह यू अक्षय’ म्हणाली होती महिला चाहती; रंजक आहे ‘तो’ किस्सा

हे देखील वाचा