अभिनेत्री दिव्या दत्ता हिला विमानतळावर वाईट अनुभव आला आहे. याबाबत तिने सोशल मिडीयावर पोस्ट करत माहिती सांगितली. विमानतळावर पोचल्यानंतर चेक करून झाल्यावर तिला कळले कि तिची फ्लाईट रद्द झाली आहे. याविषयी आधी कोणतीही घोषणा करण्यात आली नव्हती. रद्द होण्याचा कोणताही मेसेज सुद्धा तिच्यापर्यंत आला नव्हता. दिव्या म्हणाली की मला विमानतळावर त्यावेळी फारच असुरक्षित वाटत होते.
अभिनेत्री दिव्या दत्ता हिने आपल्या सोशल मिडिया अकउंट वर एक व्हिडीओ शेयर केला आहे. या व्हिडीओ मध्ये विमानतळ पूर्णतः रिकामे दिसत आहे. एका बेंचवर एक व्यक्ती बसलेला दिसत आहे. व्हिडीओ शेयर करत दिव्याने लिहिले, अशा भीतीदायक अनुभवासाठी धन्यवाद मी रद्द केलेल्या फ्लाइटसाठी चेक इन केले आहे. मला या फ्लाइटसाठी कोणतीही सूचना प्राप्त झालेली नाही. इथून बाहेर पडण्यासाठीही मला खूप त्रास सहन करावा लागतो. मदतीसाठी कर्मचारी उपलब्ध नव्हते. यामुळे माझ्या शूटवरही परिणाम झाला आहे, मी खूप अस्वस्थ आहे.
दिव्याच्या या पोस्टवर अनेक प्रतिक्रिया आल्या आहेत. सोशल मीडियावर लोकांनी सांगितले की, त्यांना खूप त्रास सहन करावा लागला. तुम्ही ते ट्विटरवर शेअर करा आणि तुम्हाला लवकरच प्रतिसाद मिळेल. आणखी एका यूजरने लिहिले की, ‘ही कसली प्रतिक्रिया आहे, तुम्ही तुमच्या ग्राहकांशी असे वागाल.
मुंबईत सध्या मुसळधार पाऊस पडत आहे, बुधवारी रात्री उशिरापर्यंत पावसामुळे मुंबईत पावसामुळे लोकांचे हाल झाले. पावसामुळे मुंबईतील अनेक उड्डाणे रद्द करण्यात आली. अनेकांनी विमान कंपन्यांबाबत तक्रार केली आहे की, फ्लाइट रद्द करण्याबाबत कोणतीही पूर्व माहिती दिली जात नाही. त्यामुळे विमानतळावर नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
या चित्रपटांचे व्हिडीओज झालेत शूटिंग दरम्यान लिक; पहा ही मजेदार यादी…