Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘तू ओढणी का घेत नाही?’, युजरच्या प्रश्नावर अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीने दिले आयुष्यभर लक्षात राहण्यासारखे प्रत्युत्तर

टेलिव्हिजन दुनियेतील प्रसिद्ध अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी या दिवसात ‘खतरों के खिलाडी 11’ या शोच्या शूटिंगमध्ये खूप व्यस्त आहे. नुकतेच काही दिवसांपूर्वी दिव्यांकाने तिचा टीव्ही शो क्राईम पेट्रोलची शूटिंग पूर्ण केली आहे. यानंतर इंस्टाग्रामवर एक पोस्ट करून ती भावुक झाली होती. क्राईम पेट्रोलचे काही एपिसोड होस्ट करताना तिने विना ओढणीचे ड्रेस घातले होते.

या शोमध्ये ओढणी न घेतल्यामुळे काहीजण तिला ट्विटरवर ट्रोल करत आहेत. जेव्हा युजरने क्राईम पेट्रोलचे एपिसोड पाहिले, तेव्हा त्याने अभिनेत्रीला प्रश्न केला की, ती या शोमध्ये ओढणी का नाही घेत?? युजरचा हा प्रश्न वाचून दिव्यांका हैराण झाली आहे. तिने या युजरला असे सडेतोड उत्तर दिले आहे की, तो आयुष्यभर हे विसरू शकत नाही.

तिने ट्विटरवर त्याला उत्तर देत लिहिले आहे की, “कारण तुमच्यासारख्या व्यक्तींना ओढणी न घेणाऱ्या मुलींकडे आदराने पाहायची सवय लागावी, म्हणून मी ओढणी नाही घेतली. तु्म्ही आणि तुमच्या आजूबाजूच्या लोकांना त्यांची नियत बदलायला सांगा. स्त्रियांनी काय घातलं आहे यावरून त्यांचे परीक्षण करू नका. माझे शरीर, माझी अब्रु, माझी मर्जी.”

एका युजरने लिहिले आहे की, “मॅडम जी घनश्यामजींचा तर तुम्ही एकदम बॅंडचं वाजवला. तुम्ही तर डायरेक्ट त्यांच्या चारित्र्यवर प्रश्न उभा केला. कदाचित तुमच्या चाहत्यांना तुम्हाला ओढणीमध्ये बघायला जास्त आवडत असेल.”

यावर अभिनेत्रीने उत्तर दिले आहे की, “हो कदाचित असेही असू शकते. तो जर माझा चाहता असेल तर त्याच्या प्रेमाला सलाम. पण महिलांच्या कपड्यांवरून त्यांचे परीक्षण करणे हे आता जुन्या काळातील गोष्टी झाल्या आहेत. आपण अभिनय, विज्ञान, राजकारण, इतिहास यांसारख्या अनेक विषयावर चर्चा करू शकतो या मानाने ओढणी हा तुच्छ विषय आहे.”

अभिनेत्री सध्या केपटाऊनमध्ये ‘खतरों के खिलाडी’ या शोची शूटिंग करत आहे. तेथील फोटो ती नेहमी सोशल मीडियावर शेअर करत असते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा