टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील सर्वात लोकप्रिय आणि प्रसिद्ध कपल आहे, दिव्यांका त्रिपाठी आणि विवेक दहिया. या दोघांची जोडी फॅन्सला तुफान आवडते. टीव्ही इंडस्ट्रीमधील सर्वात जास्त लाईमलाइट मिळवणारी जोडी म्हणून ही जोडी ओळखली जाते. दिव्यांका आणि विवेक दोघेही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रिय असून ते सतत एकमेकांसोबतचे फोटो, व्हिडिओ शेअर करताना दिसतात. विवेक आणि दिव्यांका यांच्या लग्नाला बरेच वर्ष झाले असले तरी त्यांचे प्रेम टिकून आहे. अनेकांना असा प्रश्न पडतो की, विवेक आणि दिव्यांका यांची भेट झाली कुठे? त्यांची प्रेमकहाणी आहे तरी काय? चला तर जाणून घेऊया.
View this post on Instagram
दिव्यांका आणि विवेक हे ‘ये हे मोहब्बते’ हा शो एकत्र करत होते. मात्र तेव्हा दिव्यांका शरद मल्होत्राला डेट करत होती. पण काही काळातच त्यांचे ब्रेकअप झाले. त्यानंतर ती पूर्णतः कोलमडली. त्यानंतर एक दिवस विवेक त्यांच्या सेटवर आला आणि त्याची दिव्यांकाची भेट झाली आणि औपचारिक बोलणे देखील झाले. बराच काळ सोबत एकाच मालिकेत काम केल्यामुळे ते चांगले मित्र झाले होते. त्यांनी कधीच एकमेकांना जोडीदाराच्या रूपात पाहिले नाही. मात्र त्यांचे सहकलाकार असलेल्या पंकज भाटिया यांनी त्यांना सोबत आणण्याचा एक यशस्वी प्रयत्न केला. एका मुलाखतीमध्ये विवेकने सांगितले होते की, “आमचे प्रेम हे कधीच पहिल्या नजरेतले प्रेम नव्हते. तर ते एक जुळवून आणलेले नाते होते. माझ्या सह कलाकाराने मला प्रेमाची जाणीव करून दिली मग मी तिला त्या नजरेतून पाहण्यास सुरुवात केली.”
त्यानंतर दोघांमध्ये प्रेमच अंकुर फुलू लागला. विवेकने दिव्यांकाला तिच्या वाढदिवसाच्या दिवशीच लग्नाची मागणी घातली. विवेकला पहिल्यांदा दिव्यांका तिच्या घरी भोपाळला घेऊन गेली होती. तेव्हाच सर्व घरच्या लोकांसमोर गुडघ्यावर बसून त्याने तिला लग्नाची मागणी घातली. पुढे दोन्ही कटुंबाच्या सहमतीने त्यांनी लग्न केले.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
“खोटे गोड बोलण्यापेक्षा कडू सत्य बोला”; केतकीनं चाहत्यांना दिल्या काटेरी शुभेच्छा
हॅपी मंकरसंक्रात! अमृता फडणवीसांनी घेतला पतंग उडवण्याचा आनंद, पाहा भन्नाट व्हिडिओ