Monday, July 1, 2024

‘आयी है दिवाली’ ते ‘बोले चुडियाँ’, ‘ही’ गाणी बनवतील तुमची यंदाची दिवाळी आणखी खास

देशभरात दिवाळीच्या सणाची जय्यत तयारी सुरू झाली आहे. त्यामुळे सगळीकडे उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. बॉलिवूड चित्रपटांमध्येही दिवाळीचा सण मोठ्या थाटात साजरा केला जातो. मोठमोठे कंदील, सर्वत्र लखलखणारे दिवे आणि भरपूर नाच-गाणे यामुळे हा सण सुंदर होतो. अर्थात, चित्रपट वेळेनुसार येतात आणि जातात. पण दिवाळीची गाणी दरवर्षी लोकांच्या आठवणी ताज्या करतात. आज आम्ही तुम्हाला अशा बॉलिवूड गाण्यांबद्दल सांगणार आहोत, ज्यांच्यामुळे तुमची दिवाळी आणखी सुंदर होईल.

कभी खुशी कभी गम
हा चित्रपट केवळ त्याच्या कथेसाठीच नाही, तर त्यातील प्रत्येक गाण्यासाठीही प्रसिद्ध आहे. या चित्रपटात करवाचौथपासून दिवाळीपर्यंत प्रत्येक सण कुटुंबासोबत भव्य पद्धतीने शूट करण्यात आला आहे. या चित्रपटातील ‘बोले चुडियाँ’ हे गाणे दिवाळीच्या मुहूर्तावर चित्रीत करण्यात आले होते. (diwali special memorable bollywood songs that you need in your diwali playlist)

हम दिल दे चुके सनम
या चित्रपटातील ‘ढोली तारो ढोल बाजे’ या गाण्यातील ऐश्वर्या आणि सलमानची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली होती. या चित्रपटात दिवाळीच्या सणासाठी भव्य सेट बांधण्यात आला होता. यासोबतच राजस्थानच्या परंपरेची झलकही पाहायला मिळाली.

मोहोब्बतें
या चित्रपटातील ‘पैरों में बंधन है’ हे गाणे आजही चाहत्यांना पसंत आहे. जास्तकरून तरुण पिढी हे गाणे खूप पसंत करते. या गाण्याचे खास वैशिष्ट्य म्हणजे दिवाळीसोबतच त्यात रोमान्सची छटाही आहे.

देवदास
चित्रपटातील ऐश्वर्या आणि माधुरी दीक्षित यांच्यावर चित्रित केलेले ‘डोला रे डोला’ हे गाणे खूप गाजले. या गाण्यात अभिनेत्रींनी जबरदस्त डान्स केला. मोठमोठ्या कानातल्यांमुळे ऐश्वर्याचे कानही चांगलेच सोलले गेले आणि कानातून रक्तस्त्राव सुरू झाला. हे गाणे इतके हिट झाले की आजही लोक ‘डोला रे डोला’वर नाचताना दिसतील.

होम डिलिव्हरी
‘किसने बनाई सबके लिये हॅपी दिवाली’ हे गाणे लहान मुलांची पहिली पसंती आहे. दिवाळी पार्टीतही हे गाणे लोक अनेकदा वापरतात. या गाण्याशिवाय मुलांचा सण अपूर्ण वाटतो.

आमदनी अठ्ठनी खर्चा रूपैया

गोविंदा आणि तब्बू अभिनित ‘आई है दिवाली’ हे गाणे आजही लोकांच्या चेहऱ्यावर हास्य आणते. दिवाळीच्या दिवशी तुमच्या घरात हे गाणे ऐकून तुम्ही तुमचा सण खास बनवू शकता.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-
सहाय्यक दिग्दर्शक ते अभिनेता प्रवास करूनही हर्षवर्धन मिळवू शकला नाही लोकप्रियता, वडिलांसोबत दिसण्याची चर्चा
लहानपणी दिवाळीमध्ये फटाक्यांऐवजी सलमानने जाळले होते पैसे, अशी दिली होती बापाने शिक्षा

हे देखील वाचा