Monday, July 8, 2024

सो ब्यूटीफुल…, काळजात घंटी वाजावी असा आहे अनन्या पांडेचा लूक; एकदा पाहाच

सध्या सगळीकडे दिवाळीची रोषणाई आहे. सामान्यांपासून ते कलाकारांपर्यंत सगळेजण दिवाळी साजरी करत आहे. या दिवाळीत अनेकजण नवीन वस्तू किंवा वास्तू खरेदी करत आहेत. अशातच धनत्रयोदशीला अभिनेत्री अनन्या पांडेनेही एक अतिशय मौल्यवान वस्तू खरेदी केली आहे, ज्यासोबत तिची दिवाळी आणखी खास होणार आहे. त्याच बरोबर अनन्या पांडेचा दिवाळी लूक सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

डीप नेक ब्लाउजसह सुंदर साडीमध्ये अनन्या दिसत आहे. तिचे कानातले आणि मोकळे केस तिच्या सौंदर्यात भर घालतात. अनन्याच्या या दिवाळी लूकला चाहते भरभरून प्रेम करत आहेत. अनन्या पांडेने तिचे हे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. फोटोंमध्ये अनन्या दिवाळीच्या सजावटीत सजलेल्या घरात दिसत आहे. तिने पिवळ्या रंगाची साडी घातली आहे. साडीवर डीप नेक ब्लाउज आहे. अनन्याने तिच्या लूकला शोभतील असे कानातले आणि मेकअप केला आहे.

अनन्या पांडेच्या या फोटोंना चाहत्यांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. अनेकांनी तिच्या दिवाळी लूकला “खूप सुंदर”, “मोहक” असे कमेंट केले आहेत. काही चाहत्यांनी तिच्या फोटोंवर हार्ट आणि फायर इमोजी देखील पोस्ट केले आहेत. अनन्या पांडेने नुकतेच तिचे नवीन घर विकत घेतले आहे. धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर तिने घराची पूजा केली. यावेळी तिने तिच्या नवीन घरातील फोटोही सोशल मीडियावर पोस्ट केले होते. सर्वसामान्यांप्रमाणेच अनेक सिनेतारकही दिवाळीच्या सेलिब्रेशनमध्ये मग्न झालेले दिसतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रत्येकजण आपल्या दिवाळीच्या झलक चाहत्यांशी शेअर करत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ananya 💛💫 (@ananyapanday)

 वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, अनन्या पांडे शेवटची आयुष्मान खुरानासोबत ड्रीम गर्ल 2 या चित्रपटात दिसली होती. स्टुडंट ऑफ द इयर 2 मधून तिने अभिनय क्षेत्रात प्रवेश केला.सद्य ती तिच्या रिलेशमुळे चांगलीच चर्चेत आहे. (Diwali special actress Ananya Pandey bold look viral)

आधिक वाचा-
घाणेरडे मेसेज करणाऱ्या युजरला ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रियदर्शनी इंदलकरने झापले; म्हणाली…
‘बाजीगर’ चित्रपटाला 30वर्षे पूर्ण, अभिनेत्री काजोलने शेअर केली पोस्ट

हे देखील वाचा