Monday, July 1, 2024

पौर्णिमेचा चंद्र पाहताना थेट ढगातच गेली, ३४ वर्षीय गायिकेचा दुर्दैवी अंत; संगीत क्षेत्रावर शोककळा

ग्रॅमी अवॉर्ड नॉमिनेटेड स्कॉटिश गायिका सोफी झीयनचे वयाच्या ३४ व्या वर्षी निधन झाले. शनिवारी (३० जानेवारी) ग्रीकमध्ये एका अपघातात तिने जगाचा निरोप घेतला. सोफीच्या टीमने एक निवेदन जारी करत तिच्या निधनाची माहिती दिली. सोफीच्या अचानक झालेल्या निधनामुळे संगीत क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.

सोफीच्या टीमने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ग्रीकची राजधानी अथेन्समध्ये सकाळी ४ वाजता सोफीचे निधन झाले. यासह त्यांनी सोफीच्या निधनाचे कारणही सांगितले आहे.

सोफीच्या टीमने ट्विटरवर निवेदन जारी करत म्हटले, “सोफी पौर्णिमेचा चंद्र (Full Moon) पाहण्यासाठी वर चढत होती आणि चुकून तिचा पाय घसरून ती खाली पडली. ती नेहमीच आमच्या सोबत असेल. आम्हाला आता जे दु:ख होतंय, ते आम्ही शब्दांत मांडू नाही शकत.” माध्यमांतील वृत्तांनुसार, सोफी ज्या ठिकाणी वर चढत होती, ती उंच जागा होती. घाईघाईत तिचे संतुलन बिघडल्यामुळे ती खाली कोसळली.

सोफीने सन २०१५ मध्ये मॅडोनासोबत ‘Bitch, I’m Madonna’ बनवण्यात योगदान दिले होते. यासोबतच तिने चार्ली एक्ससीएक्ससोबत EP Vroom Vroom बनवण्यातही आपले योगदान दिले होते. सोफीच्या निधनानंतर सर्व क्षेत्रातील सेलिब्रिटी दु:ख व्यक्त करत आहेत.

अनेक दिग्गजांनी सोफीला श्रद्धांजली वाहिली आहे.

https://twitter.com/MunroeBergdorf/status/1355473604834697219

https://twitter.com/shonfaye/status/1355481247200518159

यामध्ये ब्रिटीश गायक आणि गीतकार सॅम स्मिथचाही समावेश आहे. त्याने ट्वीट केले की, “खूप वाईट बातमी. जगाने देवदूत गमावला आहे. आमच्या पिढीचा एक खरा दूरदर्शी आणि आयकॉन.”

यासोबतच फ्रांसीस पॉप कलाकार क्रिस्टीन आणि क्वीन्सने सोफीचे वर्णन, “ताऱ्यांचा निर्माता, दूरदर्शी, संदर्भ” म्हणून केले आहे.

डीजे आणि निर्माता इरॉल अल्कानने ट्वीट केले की, “सोफीच्या निधनाची दु:खद बातमी.”

सोफी कोण होती?

ग्लासगो येथे जन्मलेल्या सोफीने २०१३ मध्ये संगीत रिलीझ करण्यास सुरुवात केली. तिने व्हिन्स स्टेपल्स तसेच चार्ली एक्ससीएक्स आणि मॅडोना यांच्याबरोबर काम केले.

तिने प्रथम ऑक्टोबर २०१७ मध्ये “इट्स ओके टू क्राय” साठी एक स्वत:ची प्रतिमा आणि आवाज वापरला. रेकॉर्डिंगने सोफीच्या “अल्बम ऑफ एअर पर्लच्या अन-इनसाइड” अल्बमचा रस्ता मोकळा केला. तो जून २०१८ मध्ये रिलीझ झाला आणि त्याला सर्वोत्कृष्ट नृत्य/ इलेक्ट्रॉनिक अल्बमसाठी ग्रॅमी नामांकन प्राप्त झाले.

 

हे देखील वाचा