राजकुमार रावने सोमवारी ( १५ नोव्हेंबर) अभिनेत्री पत्रलेखा बरोबर लग्न केले. चंदीगड येथील एका रिसॉर्टमध्ये त्यांचा लग्न सोहळा पार पडला. यावेळी बॉलिवूडमधील अनेक कालाकार त्यांच्या लग्नाला उपस्थित होते. अशात राजकुमारची पत्नी पत्रलेखा नेमकी कोण आहे? तिने कोणकोणत्या चित्रपटांमध्ये काम केले आहे? तसेच तिच्या आयुष्यातील अन्य काही गोष्टींची माहिती जाणून घेऊ.
बॉलिवूड अभिनेत्री पत्रलेखाचे पूर्ण नाव पत्रलेखा मिश्रा पॉल असे आहे. तिचा जन्म २० फेब्रुवारी, १९९० रोजी झाला. साल २०१४ मध्ये हंसल मेहता दिग्दर्शित ‘सिटीलाईट’ या चित्रपटामधून ती रुपेरी पडद्यावर पहिल्यांदा झळकली. या चित्रपटामध्ये राजकुमारने मुख्य अभिनेत्याची भूमिका साकारली आहे. ( do you know these 10 things about rajkumar rao bride patralekha read)
पत्रलेखाचा जन्म मेघालय येथील शिलॉंग येथे झाला. तिचे वडील एक चार्टर्ड अकाउंटंट आहेत आणि आई होम मेकर आहे. तसेच तिला एका भाऊ आणि एक बहिण देखील आहे.
पत्रलेखाने द असाम व्हॅली स्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर ती पुढील शिक्षणासाठी बंगळूरला रवाना झाली. तेथे तिने बिशॉप कॉटन गर्ल्स स्कूलमधून पदवीचे शिक्षण पूर्ण केले. तिच्या वडिलांची अशी इच्छा होती की, तिने त्यांच्या सारखे चार्टर्ड अकाउंटंट बनावे. मात्र पत्रलेखाला अभिनय क्षेत्रातच पुढे जायचे होते. चित्रपटांमध्ये येण्याआधी तिने ब्लॅकबेरी आणि डोकोमोसाठी काही जाहिराती देखील केल्या आहेत.
पत्रलेखा पॉल आणि राजकुमार राव या दोघांनीही ‘सिटीलाइट्स’ चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तसे राजकुमार राव या आधी देखील काही चित्रपटांमध्ये दिसला होता. मात्र ‘सिटीलाइट्स’ने दोघेही प्रकाश झोतात आले. चित्रपटातील पत्रलेखा आणि राजकुमार या दोघांच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले. या चित्रपटासाठी पत्रलेखाला ‘बेस्ट फिमेल डेब्यू’ पुरस्कारही मिळाला आहे.
‘बेस्ट फिमेल डेब्यू’ पुरस्कार मिळाला असला, तरी अभिनेत्री अद्याप बॉलिवूडमध्ये मोठं नाव कमवू शकलेली नाही. सिटीलाइट्स’ नंतर ती ‘नानू की जानू’ आणि ‘लव गेम्स’ या चित्रपटांमध्ये देखील झळकली आहे.
पत्रलेखाला भरतनाट्यम देखील येते. अनेक वर्षे तिने या डान्सचे शिक्षण घेतले होते.
पत्रलेखालाचा कुत्रा हा आवडता प्राणी आहे. शिलॉंगमधील तिच्या घरी ८ पाळीव कुत्रे आहेत. त्यांना चांगले आणि पोषक वातावरण मिळावे म्हणून ती गेल्या अनेक वर्षांपासून यासाठी काम करत आहे. पत्रलेखा तिच्या पाळीव कुत्र्यांबरोबर सोशल मीडियावर कायमच फोटो शेअर करत असते.
पत्रलेखा अनेक कलागुणांनी संपन्न आहे. अभिनय आणि डान्ससह तिला खेळाची देखील आवड आहे. स्विमिंग, घोडेसवारी आणि बास्केटबॉल देखील तिला येते. तिच्या प्राथमिक शाळेमधून तिने अनेक प्रकारचे खेळ शिकून घेतले आहेत.
पत्रलेखाला फक्त अभिनय नाही, तर तासंतास चित्रपट पाहणे देखील खूप आवडते. यामध्ये फक्त बॉलिवूडच नाहीतर हॉलिवूड आणि इतर चित्रपट देखील शामिल आहेत.
पत्रलेखाने बॅरी जॉन ऍक्टिंग ऍकेडमीमधून अभिनयाचे शिक्षण घेतले आहे. तिच्या पहिल्या ‘सिटीलाइट्स’ या चित्रपटासाठी तिला दिग्दर्शक हंसल मेहता यांनी राजस्थानला पाठवले होते. जेणेकरुन ती तेथील बोलीभाषा आणि नम्रता शिकू शकेल.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-Bigg Boss 15: राकेश बापट गेल्यानंतर शमिता शेट्टीलाही काढावं लागलं बाहेर, पण का?
-ओढणीआड लपलेल्या नोरा फतेहीचा देसी लूक पाहून चाहते झाले वेडे, नेटकरी म्हणाले, ‘हाय गर्मी’
-ठरलं तर! अंकिता लोखंडेने व्यक्त केली लग्नाविषयीची भावना, ‘या’ तारखेला घेणार सात फेरे