अनेक कलाकारांनी 90 मध्ये सिनेसृष्टी, टीव्ही शो मध्ये पदार्पण केले. आणि सुरुवातीच्या काळातच त्यांनी त्यांच्या कलेतून प्रेक्षकांच्या मनात भर केले. आणि त्या वेळेचे पात्र अजूनही लोकांना आठवतात. तर त्या काळात शका लाका बूम बूम नावाचा एक शो होता. ज्यामध्ये किंशुक वैद्य याची बाल कलाकार म्हणुन प्रमुख भूमिका होती. तर यांची कथा अशी होती की किंशुक वैद्य ज्याच्याकडे जादूई पेन्सिल होती. त्याने जे काही रेखाटले ते खरे ठरले. आणि या कथेला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद होता. यातील संजूची भूमिका करणारा किंशुक वैद्य आता 34 वर्षांचा आहे
शका लाका बूम बूम हा टीव्ही शो 2000 मध्ये प्रदर्शित झाला आणि 2004 पर्यंत चालला. तर किंशुक वैद्य विवाहित आहे. तो आजही खूप देखणा दिसतो. लोक त्याच्या देखण्या लूकवर मोहित होतात. किंशुक वैद्य यांनी 22 नोव्हेंबर 2024 रोजी दीक्षा नागपालशी लग्न केले आणि आता, दीड वर्षानंतर, त्यांनी त्यांच्या चाहत्यांसह एक आनंदाची बातमी शेअर केली आहे. किंशुक आणि त्यांची पत्नी दीक्षा नागपाल यांनी त्यांच्या पहिल्या अपत्याचे, एका बाळाचे स्वागत केले आहे. या जोडप्याने सोशल मीडियावर त्यांच्या चाहत्यांसह ही भावनिक बातमी शेअर केली आहे.
किंशुक यांनी 9 मार्च 2026 रोजी त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर ही आनंदाची बातमी जाहीर केली. त्यांनी नवजात बाळाच्या लहान हाताचा त्याच्या पालकांच्या बोटांना धरलेला एक गोड फोटो शेअर केला. पोस्टमध्ये त्यांनी खुलासा केला की त्यांचा मुलगा 8 मार्च 2026 रोजी जन्माला आला आहे. किंशुक वैद्य (vaidhya)हे भारतीय टेलिव्हिजनमधील प्रत्येक पिढीने ओळखले जाणारे नाव आहे. त्याने मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये बाल कलाकार म्हणून त्याच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली. मात्र, स्टार प्लसच्या हिट शो “शाका लाका बूम बूम” ने त्याला खरी ओळख मिळाली.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
2013 पूर्वी गायकांची अशी होती परिस्थिती..,श्रेया घोषाल यांनी म्युझिक इंडस्ट्रीबद्दल केला मोठा खुलासा










