पुनीत इस्सर(Punit Issar) यांना आपण अनेक चित्रपटांमधून पाहिले आहेत. मात्र त्यांना खरी ओळख दिली ती महाभारत या मालिकेतल्या ‘दुर्योधनाने’. याच महाभारत मालिकेतला एक किस्सा त्यांनी त्यांच्या फॅन्ससोबत शेयर केला. जेवणाच्या वेळी रूपा गांगुली यांना पुनीत यांच्या सोबत बघून एका महिलेने रूपा यांना हटकले होते. जाणून घेऊया पूर्ण बातमी.
पुनीत इस्सर हिंदी सिनेसृष्टीतील नावाजलेले नाव. सुदृढ शरीयष्टी आणि भारदस्त आवाज यांमुळे पुनीत हे ओळखले जातात. वयाच्या ६२ वर्षांत असून देखील पुनीत यांच्या फिटनेस आणि तंदरुस्ततीला तोड नाही.पुनीत यांनी आजवर अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. मात्र एक वेळ अशी होती जेव्हा पुनीत यांना काम मिळणे बंद झाले होते. तेव्हा महाभारतातील ‘दुर्योधनाने’ त्यांना सावरले आणि पुन्हा यश दिले.
अमिताभ बच्चन यांच्या सुपरहिट ‘कुली’ सिनेमातून पुनीत यांनी आपल्या करियरची सुरुवात केली. पुनीत यांनी कुली मध्ये नकारात्मक भूमिका निभावली होती. या चित्रपटातील एका ऍक्शन सीनमध्ये अमिताभ गंभीर जखमी झाले होते. नेमकी हा सीन अमिताभ आणि पुनीत यांच्यावर चित्रित झाला होता. त्यामुळे अमिताभ यांच्या फॅन्सने पुनीत यांना अमिताभच्या दुखापतीसाठी जबाबदार धरले. या घटनेनंतर पुनीत यांना काम मिळणे बंद तर झाले शिवाय त्यांना अनेक धमक्या असलेले पत्र मिळू लागले.
या घटनेनंतर पुनीत यांना सुमारे ६ वर्ष काम मिळाले नाही. नंतर अमिताभ यांनी त्यांच्या फॅन्सला आणि लोकांना पुनीत हे निर्दोष असल्याचे सांगत त्यांना दोष देणे बंद करा सांगितले.
तेव्हा बी.आर. चोप्रा महाभारत बनवत होते आणि त्यांना दुर्योधन भूमिकेसाठी कलाकाराची आवश्यकता होती. योगायोगाने पुनीत यांना ती भूमिका मिळाली आणि त्यांचे नशीब पालटले. पुनीत इस्सर यांना आजही दुर्योधन भूमिकेसाठी ओळखले जाते. याच महाभारतातील एका किस्सा त्यांनी सांगितला. ते म्हणाले,”महाभारताची शूटिंग जयपूरमध्ये सुरु होती. तिथल्या एका व्यापाऱ्याला हे समजल्यावर त्याने मालिकेच्या संपूर्ण टीमला जेवणासाठी आमंत्रण दिले. टीम जेव्हा जेवणासाठी हॉटेलमध्ये पोहचली तेव्हा रूपा गांगुली म्हणजेच महाभारतातील द्रौपदी, पुनीत इस्सर हे एकाच टेबलवर जेवणासाठी बसले होते.
त्यांना एकत्र पाहून एका महिला रागात रूपा यांच्या जवळ आली आणि त्याच्या कानात काहीतरी कुजबुजून निघून गेली. त्यानंतर लगेच रूपा या लगेच दुसऱ्या टेबलवर गेल्या आणि तिथे बसून जेवू लागल्या. हे पाहून पुनीत यांना विचित्र वाटले. त्यांनी रूपा यांना विचारल्यावर त्या म्हणाल्या, “ती महिला त्यांना बोलली दुर्योधन हा खूप वाईट आहे.
तू त्याच्यासोबत नको बसू.” हे ऐकल्यावर त्यांना खूप हसायला आले. आधी मला खूप वाईट वाटले मात्र माझ्या अभिनयाची ही एका पावती असल्याचे समाधान मला मिळाले.”
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
डबल एक्सेल गर्ल! सोनाक्षी सिन्हाचे काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये फुलले सौंद्रर्य
अय्याे! गाैतम असा काय वागला की, साैंदर्या शर्मा रडली ढसाढसा