भारताचा सार्वजनिक सेवा प्रसारक चॅनेल दूरदर्शनला १५ सप्टेंबर रोजी ६२ वर्षे पूर्ण झाले. १४ सप्टेंबर, १९५९ रोजी दूरदर्शन सुरू करण्यात आले होते. तसेच ८०-९० च्या दशकात लोकांच्या सर्व मनोरंजनाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी ते एकमेव स्थान बनले होते. दूरदर्शनला ६२ वर्षे पूर्ण होत आहेत, या निमित्ताने आज या लेखातून आपण दूरदर्शनच्या काही सर्वात आवडत्या शोच्या आठवणींना उजाळा देणार आहोत.
हम लोग-
भारतातील पहिला टीव्ही शो ‘हम लोग’ हा असून १९८४ मध्ये डीडी नॅशनलवर प्रसारित झाला होता. या शोची कथा एका मध्यमवर्गीय माणसाच्या कुटुंबातील दैनंदिन संघर्षांबद्दल होती. हा शो एका लोकप्रिय मेक्सिकन ‘टेलीनोवेला’वर आधारित होता. बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अशोक कुमार या शोचे सूत्रसंचालक होते. ‘हम लोग’ हा शो जवळजवळ १७ महिने चालला.
शक्तिमान-
‘शक्तिमान’ या शोने तर लोकप्रियतेचे आणि प्रसिद्धीचे शिखर गाठले. हा तो शो होता ज्याने मुकेश खन्नाला प्रत्येक मुलाचा हिरो बनवले. हा शो एका सुपरहिरोवर आधारित होता. या शोमध्ये मुकेश खन्ना यांचे शक्तिमान आणि पंडित गंगाधर विद्याधर मायाधर ओंकारनाथ शास्त्रीजी असे दोन रूप दाखवण्यात आले होते. ९० च्या दशकातील मुलांमध्ये हा शो सर्वात जास्त लोकप्रिय शो बनला होता.
फौजी-
बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानला जगासमोर आणणारा ‘फौजी’ हा दूरदर्शनचाच शो होता. भारतीय लष्कराच्या कमांडो रेजिमेंटच्या प्रशिक्षणावर आणि दैनंदिन जीवनावर हा शो आधारित होता. या लोकप्रिय शोने शाहरुखच्या कारकिर्दीत नवे वळण आणले.
बुनियाद-
‘बुनियाद’ १९८६ मध्ये डीडी नॅशनलवर प्रसारित झाला. हा शो भारत-पाकिस्तान विभाजनावर आधारित होता. रमेश सिप्पी आणि ज्योती दिग्दर्शित हा शो भारतीय प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय झाला.
रामायण-
रामानंद सागर दिग्दर्शित ‘रामायण’ हा दूरदर्शनचा आणखी एक आवडता शो होता. भगवान राम यांच्या जीवनाचे चित्रण करणारा हा शो तेव्हा तुफान लोकप्रिय होता. त्याचबरोबर गेल्या वर्षी लॉकडाऊनमध्ये प्रसारित झाल्यानंतर सर्वाधिक पाहिला जाणारा शो ठरला. त्याचे तीन मुख्य कलाकार अरुण गोविल, दीपिका चिखलिया आणि सुनील लहिरी होते. हा शो जेव्हा लागायचा, तेव्हा रस्ते संपूर्ण सामसूम असायचे.
मालगुडी डेज-
आर के नारायण यांच्या लघुकथांच्या संग्रहावर आधारित, ‘मालगुडी डेज’ ८० च्या दशकात दूरदर्शनवर प्रसारित झाला. या शोमध्ये एकूण ३९ भाग होते आणि त्या काळात हा शो लहान मुलं आणि प्रौढलोकांमध्ये लोकप्रिय होता.
नुक्कड-
‘नुक्कड’ हा कमी उत्पन्न असलेल्या लोकांच्या कष्टांवर आधारित शो ४० भागांचा होता. त्याला प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळाले, ज्यामुळे ते १९९३ मध्ये ‘नया नुक्कड’ या नवीन नावाने पुन्हा सुरू करण्यात आला.
फ्लॉप शो-
‘फ्लॉप शो’ हा १९८९ मध्ये प्रसारित होणारा एकमेव टीव्ही सिटकॉम होता. हा शो प्रसिद्ध कॉमेडियन जसपाल भट्टी यांनी लिहिला आणि दिग्दर्शित केला होता. त्यावेळी सामान्य माणसाला भेडसावणाऱ्या सामाजिक- सांस्कृतिक समस्यांवर हे एक व्यंग होते. याचे चित्रीकरण चंदीगडमध्ये झाले. मुख्य पात्र स्वतः जसपाल भट्टी यांनी साकारले होते.
ब्योमकेश बक्षी-
‘ब्योमकेश बक्षी’ हा ८० आणि ९० च्या दशकातील लोकप्रिय डिटेक्टिव्ह शो होता. बासू चॅटर्जी दिग्दर्शित या शोमध्ये रजित कपूर आणि के के रैना मुख्य भूमिकेत होते. हा शो लोकांना चांगलाच आवडडायचा.
देख भाई देख-
‘देख भाई देख’ हा शो १९९३-९४ मध्ये दूरदर्शनवर प्रसारित झाला होता. हा सिच्युएशनल कॉमेडी शो होता. जया बच्चन निर्मित या शोमध्ये मोठ्या कुटुंबात राहणारे मजेदार लोक आणि त्यांच्या समस्या हास्यास्पद पद्धतीने दाखवण्यात आल्या होत्या.
सर्कस-
‘सर्कस’ हा शो एका सर्कसची कथा होती. हा कार्यक्रम सर्कसमध्ये काम करणाऱ्या लोकांचे जीवन आणि त्यांना सर्कसमध्ये येणाऱ्या समस्यांवर आधारित होता. या शोमध्ये शाहरुख खान, मकरंद देशपांडे, पवन मल्होत्रा, आशुतोष गोवारीकर, नीरज वोरा, हैदर अली, रेणुका शहाणे आणि इतर अनेक प्रतिभावान कलाकार मुख्य भूमिकेत होते.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-मलायका अरोराला आवडतो ‘अशा’प्रकारचा व्यक्ती, मिलिंद सोमणपुढे केला खुलासा
-निधन झाले गायिकेचे, पण सपना चौधरीलाच ठरवले मृत; अफवेने उडाली होती कुटुंबीयांची झोप