नव्वदच्या दशकात प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावणाऱ्या ५ सिरीयल्स, एका सिरीयलने तर बांधले विक्रमांचे इमले


दूरदर्शनवरील प्रत्येक मालिका आणि प्रत्येक पात्र आजही अनेक चाहत्यांच्या लक्षात आहेत. जरी कोणाला लक्षात नसेल तरी लॉकडाऊनच्या दरम्यान त्या मालिकांना बघून, अनेक प्रेक्षकांच्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या असतीलच. टीव्ही प्लॅटफॉर्मवरील लोकप्रिय मालिका ‘हम लोग’, ‘रामानंद सागर’ यांची ‘रामायण’ आणि ‘महाभारत’ यामधील कलाकारांनी साकारलेल्या भूमिका आपण आजही विसरू शकलो नाहीत.

आज अशाच ५ मालिकांबद्दल आपण जाणून घेणार आहोत, ज्यांनी ९०च्या दशकात प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावलं होतं

हम लोग

हम लोग ही ‘दूरदर्शनवरील सर्वात पहिली आणि लोकप्रिय मालिका होती. ती 7 जुलै 1984 रोजी भारतीय टेलिव्हिजनवर पहिल्यांदा प्रसारित झाली होती. याचे दिग्दर्शन ‘पी कुमार वासुदेव ‘यांनी केले होते आणि लेखन ‘मनोहर श्याम जोशी’ यांनी केले होते. या मालिकेत एका भारतीय सर्वसामान्य कुटुंबाचा संघर्ष दाखविण्यात आला होता. यामुळेच या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात घर केले.

याचे 154 एपिसोड तेव्हा प्रसारित करण्यात आले होते आणि ही मालिका 17 डिसेंबर 1985 पर्यंत दूरदर्शनवर प्रसारित झाली होती.

बूनियाद

बूनियाद ही एक सर्वात जुनी आणि त्याकाळातील सर्वात लोकप्रिय मालिकांमधील एक होती. 1986 रोजी रोजी प्रसारित झालेली ही मालिका भारत- पाकिस्तानची फाळणी यावर आधारित आहे. याचे लेखन ‘ मनोहर श्याम जोशी’ यांनी केले होते आणि दिग्दर्शन ‘ रमेश सिप्पी’ आणि ‘ज्योती’ यांनी केले होते. प्रेक्षकांच्या आग्रहामुळे अनेक चॅनल्सने या मालिकेचे पुनः प्रक्षेपण केले होते.

रामायण

भारतीय टेलिव्हिजनच्या इतिहासातील सगळ्या लोकप्रिय मालिकांपैकी रामायण ही एक मालिका आहे. 25 जानेवारी 1987 मध्ये दूरदर्शनवर रामायण पहिल्यांदा प्रसारित केली होती. ‘रामानंद सागर’ यांच्या रामायणला प्रेक्षकांचं खूप प्रेम मिळालं. या मालिकेत ‘अरुण गोविले ‘ यांनी राम तर ‘दिपीका चिखली ‘ यांनी सीताचे पात्र साकारले होते. रामायणला लॉकडाऊन काळात पुन्हा दाखवल्याने सगळ्यांच्या आठवणी ताज्या झाल्या होत्या.

मालगुडी डेज

आर के नारायण ‘ यांच्या साहित्यावर आधारीत असलेली मालगुडी डेज एक लोकप्रिय मालिका होती. मालगुडी डेज ही 80 व्या शतकातील जुनी आणि लोकप्रिय मालिका होती. या मालिकेची सुरवात 1987 मध्ये झाली होती. ज्याचे 39 एपिसोड प्रसारित केले गेले होते. या मालिकेत ‘स्वामी अँड फ्रेंड्स’ आणि ‘वेंडर ऑफ स्वीट’ यांसारख्या कथा सामील होत्या. काही दिवसांनंतर ही मालिका ‘मालगुडी डेज रिटर्न्स’ या नावाने पुन्हा प्रसारित केली होती.

विक्रम और बेताल (विक्रम आणि वेताळ)

विक्रम और बेताल ही मालिका महाकवी ‘सोमदेव भट्ट’ यांची ‘बेताल पञ्चीसी’ यावर आधारित होती. जी 13 ऑक्टोंबर 1985 साली दूरदर्शनवर पहिल्यांदा प्रसारित केली होती. यामध्ये वेताळ राजा विक्रमला रोज गोष्टी सांगत असतो पण अट अशी असायची की जर वेताळ गोष्ट सांगत असताना राजा मध्ये बोला तर वेताळ राजावर नाराज होऊन पळून जाईल. परंतु प्रत्येक गोष्टी नंतर वेताळ असा प्रश्न विचारायचा की राजाला उत्तर द्यावंच लागायचं. या मालिकेचे दूरदर्शनवर 26 एपिसोड प्रसारीत झाले होते, ज्याला लहान मुलांपासून ते मोठ्यानंपर्यंत सर्वांनी पसंती दर्शवली होती.


Leave A Reply

Your email address will not be published.