Saturday, June 29, 2024

‘स्वराज्य जननी जिजामाता’ मालिकेच्या सेटवर अमोल कोल्हे यांना दुखापत; स्वत: दिली माहिती

‘स्वराज्य रक्षक संभाजी’ या मालिकेतून छ्त्रपती संभाजी महाराज यांच्या भूमिकेत दिसणारे अभिनेते म्हणजेच अमोल कोल्हे होय. ते पुन्हा एकदा ‘स्वराज्य जननी जिजामाता’ या मालिकेत छत्रपती शिवाजी महाराजांचे पात्र साकारत आहेत. अमोल कोल्हे यांना या मालिकेत अनेक साहसी कृत्य करायला लागत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल्या पराक्रमांची प्रतिकृती पडद्यावर दाखवणे काही सोप्पे काम नाहीये. ही सगळी मेहनत घेऊन अमोल कोल्हे शिवाजी महाराजांचे पात्र साकारत आहेत. अशातच या सेटवरून अशी माहिती समोर आली आहे की, एक सीन शूट करताना अमोल कोल्हे यांना दुखापत झाली आहे. याची माहिती त्यांनी स्वतः दिली आहे.

या सीनमध्ये पुण्यातील लालमहालात शाहिस्तेखानवर झालेला हल्ला दाखवायचा होता. यासाठी अमोल कोल्हे यांना एका उंच भिंतीवरून मागे स्वतःला झोकून द्यायचे (बॅक फॉल) होते. तसेच हातातली तलवार सांभाळून वार करायचा होता. याच वेळी कॅमेराचा‌ ऍंगल लक्षात घेत त्यांना अभिनय करायचा होता. या सगळ्या गोष्टींचा मेळ बसवत त्यांना दुखापत झाली आहे.

या दृश्यासाठी जेव्हा त्यांना विचारले गेले, तेव्हा त्यांनी कोणताही विचार न करता होकार दर्शवला. खरंतर हा बॅक फॉल सीन करण्यासाठी कलाकार तयार होत नाहीत. कारण यात मानेला, कंबरेला आणि मणक्याला दुखापत होण्याची शक्यता जास्त असते. तरी देखील हा सीन करताना त्यांनी शिवाजी महाराजांच्या नावाचे स्मरण केले आणि स्वतःला मागे झोकून दिले. या सीननंतर सेटवर टाळ्यांच्या गजरात त्यांचे अभिनंदन देखील झाले. (Dr. Amol kolhe get injured on set of swarajya janani jijamata)

डॉ. अमोल कोल्हे हे खासदार आहेत. तसेच ते डॉक्टर देखील आहे. परंतु त्यामध्ये जास्त मन न रमल्याने त्यांनी अभिनय क्षेत्रात प्रवेश केला. त्यांनी अनेक मराठी चित्रपटात काम केले. तसेच मालिकांमध्ये देखील काम केले आहे. त्यांनी ,’स्वराज्य रक्षक संभाजी’, ‘राजा शिवछत्रपती’, ‘राज माता जिजाऊ’, ‘वीर संभाजी’ यांसारख्या मालिकेत काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-जेव्हा विशाल दादलानीने केला होता त्याच्या वाईट सवयीचा खुलासा; एका दिवसाला पित होता ४० सिगारेट, पुढे जे झाले…

-नाशकात पोलिसांकडून रेव्ह पार्टीचा पर्दाफाश! मराठी बिग बॉस फेम हिना पांचाळसह २२ जणांना अटक

-पहिल्यांदाच आपल्या रेस्टॉरंट ‘सोना’मध्ये गेली प्रियांका चोप्रा; पाणीपुरीचा आस्वाद घेतानाचा फोटो व्हायरल

हे देखील वाचा